
ई कॉमर्स क्षेत्रात लहान संस्थांचे हित जपण्यासाठी नियामक मंडळ आवश्यक: CAIT
नवी दिल्ली : ई कॉमर्स मधील वाढत्या स्पर्धेमुळे नियमावलीचे पालन हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याविषयी बोलताना छोट्या व्यापाऱ्यांचा हीत रक्षणासाठी नियामक मंडळाची आवश्यक असल्याचे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले आहेत.
याविषयी बोलताना ते म्हणाले, ' शेअर बाजारात सेबी, टेलिकॉम क्षेत्रातील टीआरएआय याप्रमाणेच ई कॉमर्स संबंधी नियमांचे पालन करवून घेण्याकरिता स्वतंत्र नियामक मंडळाची गरज आहे. MSME संबंधी एका मेशो कार्यक्रमात ते बोलत असताना आम्ही सरकारला नियामक मंडळाची स्थापना करण्याची विनंती करणार आहोत असे म्हणाले.
पुढे बोलताना, ' वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने २०१९ चा प्रस्तावित राष्ट्रीय ई कॉमर्स धोरण अंतिम टप्यात आणण्याचे सांगितले जात आहे. ई कॉमर्स क्षेत्रातील धोरणाचा उद्देश व्यवसाय सुलभता, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब पुरवठा साखळीचे साखळीचे एकत्रीकरण व शेवटी या माध्यमातून निर्यातीसाठी नियमांच्या चौकटीत बसणारी ई कॉमर्स धोरण बनवण्याची गरज आहे व यांची घोषणा व अमंलबजावणी सरकारच्या कार्यकक्षेत बसणार आहे . परंतु मला विश्वास वाटतो की या महिन्याअखेरीस ई कॉमर्स क्षेत्रात नवीन नियमावली व धोरणे राबविली जातील' . असे उद्गार याप्रसंगी व्यक्त केले.
सरकार थेट परकीय गुंतवणूकीच्या (एफडीआय) वर निर्बंध घालण्याची शक्यता आहे असे कार्यक्रमात त्यांनी वक्तव्य केले आहे. याआधीही परदेशी आँनलाईन विक्रेते व्यापारातील एफडीआय नियमांचे उल्लंघन करतात असा आरोप याआधी व्यापारी संघटनांनी केला आहे .