या आर्थिक वर्षात फूटवेअर क्षेत्रात ११ टक्के महसूल वाढ - CRISIL
मुंबई : CRISIL ने एक प्रसिद्धीपत्रकाद्वारे फूटवेअर क्षेत्राचा महसूल या आर्थिक वर्षात ११ टक्यांनी वाढणार असल्याचा दावा केला आहे. त्यात म्हणल्याप्रमाणे ४ टक्यांनी यांचे प्रमाण वाढेल. कच्च्या मालाच्या किमतीवर ऑपरेटिंग मार्जिन सुमारे १२५ बेसिस पॉईंट्सने वाढून ९ टक्के होण्याची दाट शक्यता आहे. तरीही कोरोना पूर्वीच्या १० टक्के पातळीचा कमी असेल. इथिलीन विनाईन एसईटएप सारख्या प्रमुख पदार्थांच्या किमती ३० % ने कमी झाल्या आहेत.
या गोष्टी रोख रक्कम आणि त्यांची ताळेबंद क्रेडिट प्रोफाइल स्थिर ठेवण्यात यशस्वी होतील. त्यामधील CRISIL ने केलेल्या विश्लेषणानुसार १ लाख कोटींच्या तुलनेत महसुलाचे उत्पन्न १५ टक्के आहे. महागाईमुळे पाश्चात्य देशातील कमी झालेली मागणी जवळपास १२ टक्यांने घटली आहे . दुसरीकडे मोठ्या प्रमाणात जास्तीचा विक्री किंमतीमुळे १० टक्के विक्री वाढली आहे. या वर्षी विक्री किमतीत वाढ होण्याचे कारण Product Line जास्त किंमती सेगमेंटकडे वळणार आहे. असा निष्कर्ष क्रिसीलने नुकताच जाहीर केला आहे.
या विषयी बोलताना " फुटवेअर निर्मिती करणारे कोरोना महामारीनंतर वेगाने वाढणाऱ्या फॅशन/ महिला आणि अॅथलेझर सेगमेंटवर लक्ष केंद्रित करत आहेत, जे प्रामुख्याने प्रीमियम श्रेणीत मोडतात आणि सरासरी विक्री किंमत 1,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे. हे सेंगमेट वर्षाला 15% पेक्षा इतक्या वेगाने वाढण्याची अपेक्षा आहे , तर संपूर्ण उद्योगासाठी 11% वाढीची शक्यता असू शकते. ऑपरेटिंग प्रॉफिटीबिलेटी ही १८ टक्क्यांनी जास्त असू शकते. असलेल्या क्षमतेहून ७० टक्के अधिक वापर असल्याने फूटवेअर कंपन्यांना नाममात्र भांडवली खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. कार्यशील भांडवलाचे चक्रही स्थिर राहण्याची अपेक्षा आहे , ज्यामुळे कर्जाची वाढ कमीत कमी राहील.
क्रिसिल रेटिंग्सचे असोसिएट डायरेक्टर गौरव अरोरा सांगतात, ' सुधारित रोख प्रवाह, निरोगी ताळेबंद आणि नाममात्र भांडवली खर्च यामुळे क्रेडिट प्रोफाइल स्थिर राहतील. आमच्याकडून रेटिंग मिळालेल्या कंपन्या सुमारे 300 कोटी रुपये खर्च करतील, स्थिर मालमत्तेत किरकोळ 5% जोडतील. त्यामुळे या आर्थिक वर्षात अनुक्रमे ०.४ पट आणि ७ पट व्याज कव्हरेज अपेक्षित आहे.'
पुढील वाटचालीत कच्च्या मालाच्या किमती आणि मॅक्रोइकॉनॉमिक घडामोडींवर लक्ष क्रिसीलचे लक्ष राहणार आहे.