खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी

    22-Aug-2023
Total Views | 44

Navneet Rana

अमरावती : खासदार नवनीत राणा यांना गेल्या चार पाच दिवसांपासून जीवे मारण्याची धमकी येत आहे. धमकी देणाऱ्याचे नाव विठ्ठलराव असल्याचे समजले आहे. नवनीत राणा यांच्या मोबाईलवर आरोपीने व्यक्तीकडून "चाकूने वार करून ठार करु" असा मेसेज पाठवला आहे.
 
याप्रकणी नवनीत राणा यांचे खासगी सचिव विनोद गुहे यांनी राजापेठ पोलीस ठाण्‍यात तक्रार दाखल केली आहे. विठ्ठलराव नावाची व्‍यक्‍ती १६ ऑगस्ट पासून नवनीत राणा यांच्‍या मोबाईलवर संपर्क साधून गर्दीच्‍या ठिकाणी मी कधीही धारदार चाकूने वार करणार, ते माहितीही पडणार नाही, अशा शब्‍दांमध्‍ये धमकी देत आहे.
 
तसेच त्‍याने नवनीत राणा यांना अश्‍लील शिवीगाळ देखील केली आहे. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी आरोपीच्‍या विरोधात भादंवि ५०४, ५०६ (ब) कलमान्‍वये गुन्‍हा दाखल केला आहे.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121