नवी दिल्ली : हरियाणातील नूह हिंसाचारामध्ये सायबर पोलिस स्थानकावर हल्ला करणाऱ्या जबीर आणि इर्शाद या दोन आरोपींनी हरियाणा पोलिसांनी अटक केली आहे.
हरियाणातील नूह येथे हिंसाचार करणाऱ्यांना पकडण्यासाठी एसटीएफ आणि गुन्हे शाखा आणि इतर पोलिस पथकांची सतत शोध मोहीम सुरू आहे. खेडला चौकातील हिंसाचार तसेच सायबर गुन्हे स्थानकाची तोडफोड आणि पोलिसांची वाहने पेटवल्याप्रकरणी पोलिसांनी अरवली डोंगराळ प्रदेशातून दोघांना अटक आहे. जबीर आणि इर्शाद ही पोलिस स्थानकावर हल्ला करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. या दोघांचीही पोलीस कसून चौकशी करत असून जेणेकरुन नियोजित हिंसाचारात आणखी कोण सहभागी होते हे पुढे येऊ शकेल.
नूह हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत २६४ जणांना अटक करण्यात आली आहे. हरियाणा पोलिस आणि एसटीएफचे पथक आरोपींवर सातत्याने कारवाई करत असून शोध मोहीम राबवत आहेत. हरियाणा पोलीस सातत्याने जनता आणि पत्रकारांकडूनही सहकार्याची मागणी करत आहे.