'गदर २' फेम अभिनेता सनी देओलच्या मुंबईतील बंगल्याचा होणार लिलाव
20-Aug-2023
Total Views |
मुंबई : सध्या सनी देओल अभिनयित 'गदर २' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अशातच आता अभिनेता सनी देओलच्या मुंबईतील बंगल्याचा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावामागचे कारण म्हणजे त्याने बँकेकडून घेतलेले कर्ज अद्याप दिलेले नाही. त्यामुळे बँकेचे कर्ज फेडण्याकरिता मुंबईतील बंगल्याचा लिलाव करण्यात येणार आहे.
दरम्यान, अभिनेता सनी देओल याने 'बँक ऑफ बडोदा'कडून मोठ्या रकमेचे कर्ज घेतले होते. जे अद्याप फेडण्यात आले नव्हते. त्यामुळे बँकेकडून सनी देओलच्या मुंबईतील जुहू येथील बंगल्याच्या लिलावासाठी जाहिरात दिली आहे. तसेच, कर्जाची रक्कम जवळपास ५६ कोटी असून त्याची पूर्तता करण्यासाठी 'सनी व्हिला'चा येत्या २५ सप्टेंबरला लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावासाठी मालमत्तेची आरक्षित किंमत ५१.४३ कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.