एआयसीटीईची जिओ इन्स्टिट्युटशी अध्यापन प्रशिक्षणासाठी हातमिळवणी
मुंबई : उद्योग विश्वातील मोठी बातमी समोर येत आहे. एआयसीटीईने (AICTE) आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्सने तज्ञ निर्माण करण्यासाठी जिओ इन्स्टिट्यूटशी हातमिळवणी केली आहे. AICTE ने अटल ट्रेनिंग आणि लर्निग प्रोग्राम अंतर्गत या योजनेचा श्रीगणेशा होणार आहे. AICTE शी निगडीत असलेल्या सर्व संस्थासाठी या ट्रेनिंग कार्यक्रमाचा लाभ होऊ शकणार आहे. ५ दिवसीय प्रक्षिशण कार्यक्रमाचे आयोजन जिओ इन्स्टिट्युटने केले आहे. हे प्रशिक्षण २१ तारखेला आयोजित करण्यात आले आहे.
याविषयी बोलताना प्राध्यापक टी जी सितारामन म्हणाले, ' भविष्यातील आव्हाने लक्षात घेता प्राध्यापकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानचे प्रशिक्षण देणे गरजेचे असल्यामुळे ही हातमिळवणी केली ज्यातून आमची या क्षेत्रातील वचनबद्धता आपल्याला जाणवेल. शैक्षणिक दृष्ट्या दर्जेदार प्रशिक्षणासाठी आवश्यक ती सगळी कौशल्ये अध्यापकांनी आत्मसात करावी हा यामागचा उद्देश आहे.'
डेटा विजुलायझेशन, अँपलिकेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स अशा विविध विषयांवर आधारित हे प्रशिक्षण देण्यात येईल.