ठाणे : इसिस प्रकरणी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, पडघा येथील बोरिवली गावातील शमील नाचन याच्या घरात धाड टाकुन शोधमोहीम राबवली.यावेळी घरातुन दहशत माजवण्यासाठी लागणारी सामुग्री तसेच हार्डडिस्क,मोबाईल फोन आणि बॉम्ब बनविण्याबाबतची काही हस्तलिखिते जप्त करण्यात आली.
शमील साकिब नाचनला गेल्या आठवड्यात इसिस प्रकरणात अटक करण्यात आली होती. १८ ऑगस्टपर्यंत एनआयएकडे त्याचा ताबा आहे. शमील नाचनसह त्याच्या आणखी पाच साथिदारांनाही अटक केली होती. या अटक करण्यात आलेल्या आरोपींकडुन भारत देशाविरोधी कटाची माहिती मिळाली होती. शमीलने यातील दोन अटक आरोपींना पडघा येथे घर भाड्याने देण्यासाठी मदत केल्याचे समोर आल्याने एनआयएने हे धाडसत्र केल्याची सूत्रांनी सांगितले.