१० वी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधरांना रेल्वेत नोकरीची संधी
16-Aug-2023
Total Views | 57
मुंबई : भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून उत्तर रेल्वेकडून नोकरभरती संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उत्तर रेल्वेत लवकरच नोकरभरती होणार असून जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. उत्तर रेल्वेत ४०० हून अधिक रिक्त पदे भरण्यात येणार असून विविध जागांसाठी ही नोकरभरती होणार आहे.
दरम्यान, उत्तर रेल्वेत होणाऱ्या भरतीमध्ये १० वी, आयटीआय, असिस्टंट लोको पायलट या पदांकरिता भरती होणार आहे. तसेच, उत्तर रेल्वे अंतर्गत ४१६ रिक्त जागा ह्या ‘असिस्टंट लोको पायलट, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, ट्रेन मॅनेजर’ या पदांच्या भरण्यात येणार आहेत. तसेच, लोको पायलट आणि असिस्टंट लोको पायलट ही पदेसुध्दा या भरतीद्वारे भरली जाणार असल्यामुळे एकूण ३२३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
रेल्वे भरती सेल, उत्तर रेल्वे अंतर्गत ‘वरिष्ठ तांत्रिक सहयोगी (सिव्हिल), वरिष्ठ तांत्रिक सहयोगी (इलेक्ट्रिकल), वरिष्ठ तांत्रिक सहयोगी (सिग्नल आणि दूरसंचार)’ पदांच्या एकूण ९३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. दरम्यान, उत्तर रेल्वेमधील रिक्त पदांसाठी १०वी, आयटीआय, डिप्लोमा किंवा पदवीधर उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्यासाठी २८ ऑगस्ट २०२३ शेवटची तारीख असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे. अर्ज भरण्याकरिता रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट nr.indianrailways.gov.in ला भेट द्या.