'बीएमसी'त नोकरीची संधी; टायपिंग येतयं? मग आजच अर्ज करा

    16-Aug-2023
Total Views | 34
Brihanmumbai Municipal Corporation Recruitment 2023

मुंबई :
बृहन्मुंबई महानगरपालिका लवकरच रिक्त पदे भरणार असून अर्ज मागविण्यात येत आहेत. बीएमसीकडून नोकरभरती संदर्भात जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून पालिकेअंतर्गत विविध खात्यांच्या आस्थापनेवर ‘कनिष्ठ लघुलेखक’ (इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेकरिता) या संवर्गातील एकूण २२६ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.
 
दरम्यान, कनिष्ठ लघुलेखक (Junior Stenographer) या पदांकरिता अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून महापालिकेच्या अधिकृत वेबसाईट https://portal.mcgm.gov.in वर यासंदर्भात माहिती तुम्हाला मिळेल. दरम्यान, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदत निश्चित करण्यात आली असून दि. १५ ऑगस्ट २०२३ ते ०४ सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. तसेच, भरतीबाबत विहित अर्हता व अटींची पूर्तता करण्यास पात्र व इच्छुक उमेदवारांवर नमूद केलेल्या लिंकवर भेट देऊन अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121