'मॅगनीज ओर इंडिया लिमिटेड'मध्ये नोकरीच्या संधी; आजच अर्ज करा
15-Aug-2023
Total Views | 71
मुंबई : 'मॅगनीज ओर इंडिया लिमिटेड'मध्ये नोकरीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. 'मॅगनीज ओर इंडिया लिमिटेड'कडून याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. मॉयल लिमिटेड अंतर्गत “पदवीधर प्रशिक्षणार्थी, व्यवस्थापक” पदांच्या एकूण २१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०२३ आहे.
दरम्यान, मॉयल लिमिटेड अंतर्गत नोकरी ठिकाण हे नागपूर असणार आहे. मॉयल लिमिटेडमधील भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज करण्याची तारीख २२ जुलै २०२३ पासून सुरु झाली असून अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०२३ असणार आहे. २१ पदांसाठी निघालेल्या भरतीप्रक्रियेतून पदवीधर प्रशिक्षणार्थी (खाणी) १५ पदे, पदवीधर प्रशिक्षणार्थी (यांत्रिक) ०४ पदे, व्यवस्थापक ०२ पदे भरली जाणार आहे. तसेच, या भरतीविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट www.moil.nic.in ला भेट द्या.
दरम्यान, या भरतीसाठी उमेदवारासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. १५ ऑगस्ट २०२३ रोजी पदवीधर प्रशिक्षणार्थींसाठी वयोमर्यादा ३० वर्षे आणि सर्वसाधारण आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी व्यवस्थापक (सर्वेक्षण) पदासाठी ३५ वर्षे आहे. राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी वयोमर्यादा शिथिल आहे. तसेच, उमेदवारांसाठी अर्ज फी सामान्य / ईडब्ल्यूएस / ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना ५९० रुपये शुल्क भरावे लागेल. एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उमेदवार/ईएक्सएस/मॉयल लिमिटेडच्या कर्मचार्यांसाठी अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.