बंगलोर : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत असतात. आताही त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त दावा केला आहे. कर्नाटकातील हुबळी येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना दिग्विजय सिंह म्हणाले की, "सावरकर हे हिंदुत्व या शब्दाचे निर्माते आहेत. हिंदुत्वाचा हिंदू धर्म किंवा सनातन धर्माशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे."
दिग्विजय सिंह पुढे बोलताना म्हणाले की, मृदू किंवा कठोर हिंदुत्व असे काहीही नाही. ते म्हणाले की, "जर कोणी घटनात्मक पदावर असेल तर त्याने हिंदू राष्ट्राबद्दल बोलण्यापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणाले की, संविधानाच्या शपथेखाली काम करणारा कोणीही ‘हिंदू राष्ट्र’ बोलतो, त्याने आधी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्यानंतरच काही सांगितले पाहिजे."
दिग्विजय सिंह यांनी आधीही अनेक वेळा हिंदू धर्माविषयी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केली आहेत. त्यांच्यावर काही दिवसांपूर्वीच वादग्रस्त विधान केल्यामुळे तक्रार देखील दाखल करण्यात आली होती.