७६ व्या स्वांतत्र्यदिनानिमित्त मोतीबाग येथील संघ कार्यालयात ध्वजारोहण
15-Aug-2023
Total Views | 44
पुणे : भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेचे मोतीबाग संघ कार्यालय येथे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अनंतराव देशमुख यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता ध्वजारोहण झाले. यावेळी पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, कसबा भाग संघचालक प्रशांत यादव आणि भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेचे सदस्य प्रकाशराव आठवले उपस्थित होते.
डॉ. देशमुखांनी यावेळी आधुनिक शिक्षण पद्धती हा विषय अत्यंत सोप्या शब्दात समजावून सांगितला. ते म्हणाले की, " नव्याने येणारी शिक्षण पद्धती ही देशाचा सुजाण व सुसंस्कृत नागरिक निर्माण होण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे". यावेळी प्रशांत यादव म्हणाले की, संघाची शाखा हे संस्काराचे विद्यापीठ आहे, त्यातूनच संस्कार घडत असतात.
या कार्यक्रमासाठी कसबा भागातील विविध क्लासेसचे शिक्षक आणि अभ्यासिका चालवणारे संचालक यांना निमंत्रित करण्यात आले होते. निमंत्रितांनी यावेळी भारतमाता पूजन केले , त्यांचा भारतमातेची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भालचंद्र जोशी यांनी तर सूत्रसंचालन आशिष सोमण यांनी केले.