पुण्यात तलाठी भरती परीक्षा घेणाऱ्या कंपनीचा भोंगळ कारभार उघड
14-Aug-2023
Total Views | 329
पुणे : राज्यात तलाठी भरतीप्रक्रियेत पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाला आहे. पुण्यात तलाठी भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना मनस्तापास सामोरे जावे लागत आहे. भरती प्रक्रियेत इच्छुक उमेदवारांनी पसंतीचे परीक्षा केंद्र निवडले असता त्यांना दूरवरचे केंद्र देण्यात आले आहे. यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान राज्यात तलाठी भरतीप्रक्रियेसाठी राज्यभरातून अर्ज भरण्यात आले आहेत. तसेच, ज्या कंपनीला या भरतीसाठी नियुक्त करण्यात आले होते. त्याकंपनीकडून हा गोंधळ घातला गेला आहे. यात कंपनीने पसंतीचा क्रमांक उमेदवाराने निवडला असला तरी त्या उमेदवारास दूरवरचे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. त्यामुळे तलाठी भरती परीक्षा घेणाऱ्या कंपनीचा भोंगळ कारभार उघड झाला आहे.