"15 मिनट के लिए पुलिस को हटा दो फिर देखते हैं..."- औवेसी नंतर आता रझाने दिली हिंदूना धमकी

    14-Aug-2023
Total Views | 74
ANSARI 
 
लखनऊ : उत्तर प्रदेशामधील बरेली जिल्हा पोलिसांनी फेसबुकवर भडकाऊ व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी ८ जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. सद्दाम, उवैश, सोहिल, मुस्तफा, अरमान, सलमान आणि ताहिर अशी त्यांची नावे आहेत. या सर्वांवर अकबरुद्दीन औवेसी यांनी हिंदूंना दिलेले १५ मिनिटांचे धमकीचे शब्द लिहून मोहरमचा व्हिडिओ मिसळून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप आहे.
 
या प्रकरणात फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र सिंग आहेत. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, १३ ऑगस्ट रोजी ड्युटीवर असताना सायबर सेलद्वारे एक व्हिडिओ मिळाला. या व्हिडिओमध्ये मोहरमची मिरवणूक दिसत आहे. व्हिडिओच्या वर नाझिम रझा नावाच्या व्यक्तीने लिहिले, “अंसारी हैं साहब किसी से दब के थोड़ी रहेंगे. १५ मिनट के लिए पुलिस को हटा दो. फिर देखते हैं किसमें कितना दम है.”
 
 
तपासादरम्यान, हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर करणारा नाझिम रझा उर्फ सद्दाम हा बरेली येथील हाफिजगंजचा रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. एफआयआर पोलिसांनी म्हटले आहे की, हा व्हिडिओ उवैश, सोहिल, मुस्तफा, अरमान, ताहिर, सलमान आणि सलमान यांनी डाऊनलोड करून व्हायरल केला आहे.
 
आरोपींनी समाजातील लोकांना भडकवण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ व्हायरल केल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे. पोलिसांनी ८ आरोपींवर आयपीसी कलम १५३-ए, ५०५ (१) (सी) आणि आयटी कायद्याच्या कलम ७४ नुसार कारवाई केली आहे. सर्व आरोपी हे बरेलीच्या हाफिजगंज आणि इज्जतनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रहिवासी आहेत.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121