मायक्रोसॉफ्टचे एआयचे फिल्डवर्कर्स साठी मोठे पाऊल
नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टने नेहमीच तंत्रज्ञान क्षेत्रात दिशादर्शक कामगिरी केली आहे. मायक्रोसॉफ्टचा ऑफिस 365 ने कॉर्पोरेट जगतात यशाचे नवे शिखर गाठले असल्याचे आपण पाहिले. यात नवे पाऊल म्हणून मायक्रोसॉफ्टने फिल्ड वर्कर्स करता अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरवले आहे. यामुळे फील्ड सर्विसेसचा उपाययोजनांसाठी त्याचा लाभ होणार आहे.' कोपायलट ए आय 'असिस्टंट म्हणून ड्युटीवर असलेल्या पर्यावेक्षकांना कामगारांचा कामाचा आढावा मिळण्याची इत्यंभूत माहिती मिळवणे शक्य होणार आहे.
को पायलट सर्विसचा माध्यमातून डायनॅमिक ३६५ सर्विसेस अनेक क्षेत्रातील लोकांना वापरता येईन. टेक्निकल,उत्पादन क्षेत्र अशा अनेक क्षेत्रातील लोकांना याचे सहाय्य मिळणार आहे.
मायक्रोसॉफ्टचे कॉर्पोरेट उपाध्यक्ष बिझनेस एप्लिकेशन्स आणि प्लॅटफॉर्म लिली चेंग म्हणाले, 'अनेक तंत्रज्ञ,कामगार पेन पेपरवर अवलंबून असतात.काम सुलभ व लवकर झाल्याने वेळेची बचत होऊन वर्क फ्लो नियंत्रित करणे शक्य होणार आहे.'
या ए आय तंत्रज्ञानात बिझनेस डेटा बरोबरच अनेक भाषांचे एल एल एम मॉडेल हे मायक्रोसॉफ्टचा सगळ्या एप्लिकेशन्सशी संलग्न असेल.यात एम एस ऑफिसचा देखील समावेश आहे.
आय एन एस या वृत्तसंस्थेने यासंबंधित वृत्त दिले आहे.