मुंबई : माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला आहे. बॉडी बॅग किट खरेदीत गैरव्यवहार प्रकरणात २८ ऑगस्टपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयाने ईओडब्ल्यूला दिले आहेत. या प्रकरणात किशोरी पेडणेकर यांच्या तर्फे अटकपूर्व जामिन अर्ज दाखल करण्यात आला होता.
कोरोना काळात बॉडी बॅग प्रकरणात किशोरी पेडणेकर यांनी 50 लाखांचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. कोरोना काळात मृत पावलेल्या रुग्णांसाठी बॉडी बॅग खरेदी करण्यात आल्या होत्या. यातील एक बॅग 1300 रुपयांना होती. मात्र, पेडणेकर यांच्या सांगण्यावरून ही एक बॅग 6800 रुपयांना खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.