जाणून घ्या! केरळचं नाव केरलम् असं का बदलण्यात येतंय?

    11-Aug-2023
Total Views | 839

Pinarayi Vijayan


केरळ :
भाषेच्या आधारावर १ नोव्हेंबर १९५६ रोजी केरळ नावाच्या राज्याची स्थापना झाली. मात्र, आता केरळ सरकारने हे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. केरळ हे नाव बदलून ते केरळम् असे करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मुख्‍यमंत्री पिनराई विजयन यांनी बुधवारी ९ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारला केरळचे नाव बदलून ते ‘केरळम्’ करण्याची विनंती करण्याचा ठराव केरळ विधानसभेत मांडला. त्यानंतर हा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
 
केरळ राज्याचे नाव बदलण्याचे नेमके कारण काय आहे?
 
साधारणत: १९२० साली नागपुरात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची बैठक सुरु होती. या बैठकीत नवीन राज्याची निर्मिती ही केवळ प्रादेशिक आधारावर न करता भाषिक आधारावर व्हावी, असा ठराव मंजूर करण्यात आला.
 
त्यानंतर पुढच्या वर्षी १९२१ मध्ये, काँग्रेस पक्षाने त्रावणकोर, कोची आणि मलबार या प्रदेशांसाठी आपल्या युनिटचे केरळ प्रदेश काँग्रेस कमिटी असे नामकरण केले. यावेळीच पहिल्यांदा केरळ नावाचा पायंडा रचला गेला. त्याचवेळी या भागात राहणाऱ्या मल्याळी लोकांनी ऐक्य केरळ चळवळीच्या नावाने आंदोलन सुरू केले. त्रावणकोर, कोची आणि मलबार येथे राहणाऱ्या मल्याळी लोकांसाठी स्वतंत्र राज्याची मागणी करणे हा या आंदोलनाचा उद्देश होता.
 
पुढे, देशाच्या स्वातंत्र्यानंतर १ जुलै १९४९ रोजी त्रावणकोर आणि कोची ही दोन राज्ये निर्माण झाली. परंतू लोकांना याचा फारसा आनंद झाला नाही. त्यानंतर जवळपास तीन दशके मल्याळम भाषेतील सर्व लोकांसाठी वेगळ्या राज्याची चळवळ सुरु होती. शेवटी १९५६ मध्ये भाषिक आधारावर केरळ नावाचे वेगळे राज्य निर्माण झाले.
 
केरळचे नाव बदलण्याचे सरकारने सांगितलेले कारण असे की, केरळ विधानसभेत मंजूर झालेल्या ठरावानुसार, खरं तर केरळचे नाव मल्याळम भाषेत केरळम् असे आहे. हिंदी आणि इतर भाषांमध्ये त्याला केरळ असे म्हणतात. हे नाव बदलण्याचा उद्देश केरळ राज्याची ओळख, भाषा, संस्कृती आणि विकासाला चालना देणे हा आहे.


अग्रलेख
जरुर वाचा
बिहारमधील गोपाळगंजमधील घटना, ईदच्या रात्री युवतीचा मृत्यू?

बिहारमधील गोपाळगंजमधील घटना, ईदच्या रात्री युवतीचा मृत्यू?

बिहारमधील गोपालगंजमधील एका युवतीचे धड झाडाला टांगण्यात आले होते. यावेळी युवतीच्या निकटवर्तीयांनी आरोप केला की, गावातील युवकांनी मिळूनच तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि तिची हत्या करण्यात आली. पीडितेने आत्महत्या केली असावी असा समज निर्माण व्हावा यासाठी तिला एका झाडाला टांगण्यात आले होते. संबंधित प्रकरण हे मांझागड ठाणे क्षेत्रातील आहे. पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालत युवतीची हत्या करणाऱ्या प्रियकराच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पोलिसांनी घडलेल्या घटनेप्रसंगी अनेक तपास करण्यात आले आहेत. या तपासातून संबंधि..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121