किशोरी पेडणेकरांच्या अडचणी वाढणार! मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल होणार?

    11-Aug-2023
Total Views | 124

Kishori Pednekar 
 
 
मुंबई : माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर कोरोना काळातील भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. कोरोना काळात बॉडी बॅग प्रकरणात किशोरी पेडणेकर यांनी 50 लाखांचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आर्थिक गुन्हे शाखेने किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर आता ईडीही अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. ईडीही किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते आहे.
  
ईडीकडून किशोरी पेडणेकर यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. किशोरी पेडणेकरांवरील आरोपांची ईडीने आर्थिक गुन्हे शाखेकडून माहिती मागवली होती. आता ईडीकडून पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आधी आर्थिक गुन्हे शाखेनेही पेडणेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
 
त्यांनी वेदांता कंपनीकडून लाच घेतल्याचं सांगितलं जात आहे. कोरोना काळात मृत पावलेल्या रुग्णांसाठी बॉडी बॅग खरेदी करण्यात आल्या होत्या. यातील एक बॅग 1300 रुपयांना होती. मात्र, पेडणेकर यांच्या सांगण्यावरून ही एक बॅग 6800 रुपयांना खरेदी करण्यात आली. स्वत:च्याच वेदांता इनोटेकला पेडणेकर यांनी कंत्राट दिल्याची तक्रार आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121