मुंबईपेक्षा दिल्लीत जवळपास १० रुपयांनी पेट्रोल स्वस्त
01-Aug-2023
Total Views | 42
मुंबई : देशात इंधनाचे दर सतत खाली वर होत असतात. त्यात देशातील विविध शहरांत त्याची किंमतसुध्दा निरनिराळी असते. त्यामुळे प्रत्येक शहरातील इंधनदरात तफावत आढळून येते. दरम्यान, मुंबई शहरातील पेट्रोलच्या किंमत ही दिल्लीच्या पेट्रोल किंमतीपेक्षा १० रुपयांनी अधिक आहे. म्हणजेच. मुंबईपेक्षा दिल्लीत पेट्रोल जवळपास १० रुपयांनी स्वस्त आहे. तसेच, ऑगस्टच्या पहिल्या दिवशीच पेट्रोल कंपन्यांनी दर जाहीर केले आहेत.
दरम्यान, कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. चेन्नईमध्ये पेट्रोल दर १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. तर दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये तर डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. तर मुंबईत १०६.३१ आणि ९४.२७ रुपये प्रति लिटर दराने पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध आहे.