मुंबई : बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी गेल्या महिन्यात आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले होते. यावेळी त्यांनी हजारो कार्यकर्त्यांसोबत सोलापूर जंगी रोड शो केला होता. त्यानंतर आता सोलापूरात बीआरएसमध्ये इनकमिंग सुरु असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. दरम्यान, चार माजी नगरसेवकांसह ५०० कार्यकर्ते बीआरएसमध्ये प्रवेश केला. दरम्यान, यात बड्या शिक्षण संस्थेच्या सचिवासह पाचशे कार्यकर्तांचा ताफा हैदराबादमध्ये दाखल झाला होता. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. राव यांच्या उपस्थितीत बीआरएसमध्ये प्रवेश केला.
दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी नुकतेच नागपुरात बीआरएस कार्यालयाचे उद्घाटन करून पंढरपूर आणि तुळजापूरला भेट दिली. ते म्हणाले की, अर्थमंत्री टी हरीश राव मेळाव्याच्या व्यवस्थेची देखरेख करण्यासाठी एक आठवडा अगोदर सोलापूरला रवाना होतील. शहरातील पक्षाच्या स्थानिक नेत्यांवर यापूर्वीच नियोजन आणि तयारीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.