शरद पवार गट दिल्लीत! नेमकं काय घडतंयं? पक्ष कुणाकडे जाणार?

    06-Jul-2023
Total Views | 288

Sharad Pawar  
 
 
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बंड केल्यानंतर ४० आमदारांनी पूर्ण पाठिंबा त्यांना दिला. तर शरद पवार यांच्याकडे १६ आमदार शिल्लक आहेत. याच पार्श्वभुमीवर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज ६ जुलै रोजी बैठक होत आहे. शरद पवार यांनी बोलवलेली राष्ट्रीय कार्यकारिणीची ही बैठक अनेक अर्थांनी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पक्षातील बंडखोरी, निवडणूक चिन्ह, पक्षाचे नाव यासारख्या मुद्द्यांवर राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा होऊ शकते.
 
दरम्यान, ३०जून रोजी झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार यांच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसची कमान अजित पवार यांच्या हातात असेल, असा ठराव मंजूर करण्यात आल्याचा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आलेल्या याचिकेत करण्यात आला आहे. या सगळ्यात आता शरद पवार यांनी ६ जुलै रोजी नवी दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे आता नेमका पक्ष कुणाचा याच्याकडे सगळ्याचं लक्ष्य लागलं आहे.
 
या बैठकीला राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राज्य कार्यकारिणीतील ४०सदस्य उपस्थित राहणार आहेत. तसेच सर्वच राज्यांचे प्रदेशाध्यक्षही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी 3 वाजता दिल्लीत ही बैठक होत आहे. बैठकीला शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, पीसी चाको, योगानंद शास्त्री, जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला जयंत पाटील गैरहजर राहणार असल्याची माहिती आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
दाऊदी बोहरा समुदायाचे शिष्टमंडळ पंतप्रधानांच्या भेटीला; वक्फ बोर्डावरून महत्त्वपूर्ण चर्चा; काय घडलं?

दाऊदी बोहरा समुदायाचे शिष्टमंडळ पंतप्रधानांच्या भेटीला; वक्फ बोर्डावरून महत्त्वपूर्ण चर्चा; काय घडलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानी गुरुवारी दाऊदी बोहरा समुदायाच्या शिष्टमंडळाशी संवाद साधला. त्यात व्यापारी नेते, व्यावसायिक, डॉक्टर, शिक्षक आणि दाऊदी बोहरा समाजातील अनेक प्रमुख प्रतिनिधींचा समावेश होता. उपस्थितांनी वक्फ बोर्डासोबत असलेल्या आपल्या संघर्षाबद्दल सांगितले. शिष्टमंडळाने त्यांच्या समाजातील सदस्यांच्या मालमत्तेवर वक्फने चुकीचा दावा कसा केला हे देखील स्पष्ट केले. वक्फ दुरुस्ती कायदा आणल्याबद्दल शिष्टमंडळाने पंतप्रधानांचे आभार मानल्याचे दिसून आले. PM talk ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121