मुंबई : नोबेल पारितोषिक विजेते प्रा. अमर्त्य सेन यांनी समान नागरी कायद्यावर प्रतिक्रिया दिली. पश्चिम बंगालमधील त्यांच्या विश्वभारती निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, "समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.समान नागरी कायदा ही एक फसवणूक असून हा हिंदू राष्ट्राशी जोडणारा एक अजेंडा आहे. अशा प्रयत्नांचा फायदा कोणाला होणार?"असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
अमर्त्य सेन म्हणाले, " आज वृत्तपत्रांमध्ये पाहिले की यूसीसीच्या अंमलबजावणीत आणखी विलंब होऊ नये. असं बोलण्याचा एवढा मूर्खपणा कुठून आला? आम्ही हजारो वर्षांपासून त्याशिवाय जगत आहोत आणि भविष्यातही त्याशिवाय जगू शकतो. ‘हिंदु राष्ट्र’ हा एकमेव मार्ग असू शकत नाही ज्याद्वारे देशाची प्रगती होऊ शकते. आणि या प्रश्नांकडे व्यापक दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. हिंदू धर्माचा वापर किंवा गैरवापर करण्याचा प्रयत्न नक्कीच होत आहे." असं अमर्त्य सेन बरळले आहेत.