'मुझे इंडिया आने लायक नही छोडा....'नसरुल्लासोबत निकाह केल्यानंतर अंजूची व्यथा
28-Jul-2023
Total Views | 5772
1
नवी दिल्ली : भारतातून थेट पाकिस्तानातो आपल्या प्रियकराच्या शोधात गेलेल्या अंजूने अखेर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, अंजूने आजतक या हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, आपण भारतातून पाकिस्तानात इस्लाम धर्म स्वीकारल्याचे तिने जाहीर केले आहे. तसेच, आपण भारतात येण्याच्या लायकीचे राहिले नसल्याचे देखील तिने सांगितले. दरम्यान, अंजूने फेसबुक फ्रेंड नसरुल्लाला भेटण्यासाठी ती पाकिस्तान गाठून त्याच्याशी विवाह केला. या लग्नानंतर अंजूच्या व्यथा समोर येऊ लागल्या आहेत.
दरम्यान, अंजूने या मुलाखतीमध्ये म्हटले की, आपल्याला परत भारतात येण्याची वाट बिकट असून तिकडे काय काय होतयं यामुळे आपल्याला चिंता वाटत आहे. तसेच, माझे कुटुंबीय, मुलं मला स्वीकारणार नाहीत, त्यामुळे माझे भारत येणे कठीण होऊन बसले आहे. दरम्यान, प्रियकर नसरुल्लाशी केलेल्या लग्नाविषयी तिला विचारण्यात आले, ती म्हणाली, मी सुखात असून कोणताही त्रास आपल्याला सहन करावा लागत नाही, असेही तिने यावेळी स्पष्ट केले. तसेच, मला कुठल्याही प्रकारची धमकी पतीकडून मिळालेली नाही, मी स्वखुशीने पाकिस्तानात राहत आहे, असे तिने सांगितले.
तसेच, मुलाखतीत तिच्यावर एक आरोप करण्यात आला की, तुम्ही पाकिस्तानात जाऊन लपल्या आहात, तशाप्रकारची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत होती. यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले असून पाकिस्तानात कोण येत नाही, पर्यटक पाकिस्तानात येत नाहीत? मी इथं आलेय, मग सगळ्यांनाच का त्रास झाला, असे तिने सांगितले.
दरम्यान , भारतीय महिला अंजू पाकिस्तानात गेल्याने चर्चेत आली होती. ती राजस्थानमधील भिवाड़ी येथील रहिवासी आहे. वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार , अंजू पतीला जयपूरला जात असल्याचे सांगत घराबाहेर पडली. पण त्यानंतर अंजूने पाकिस्तान गाठले. फेसबुक फ्रेंड नसरुल्लाला भेटण्यासाठी ती पाकिस्तानात गेल्याचे बोलले जात आहे. एकीकडे अंजूचा दावा आहे की , ती सीमा हैदरसारखी नाही आणि पाकिस्तानात एका लग्नात सहभागी होण्यासाठी आली आहे. तर नसरुल्ला म्हणतो की , अंजू त्याच्याशी लग्न करण्यासाठी आली आहे आणि त्यानंतर भारतात परतेल.