मुंबई : मुंबईसह राज्यातील पाच जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यातील मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, पालघर, नाशिक, यवतमाळ आणि चंद्रपूर या पाच जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.त्यामुळे मुंबईसह पाच जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दुपारनंतर मुंबईत पावसाचा जोर वाढेल असाही अंदाज आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच याकाळात मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.
जोरदार पावसाने अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. अंधेरी , मालाड, कांदिवली बोरिवली इथेही पावसाला जोरदार सुरूवात झाली असून अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. चर्चगेटजवळ रेल्वे परिसरात पाणी साचलं आहे. रेल्वे रुळांवरच पाणी रस्त्यावर आल्याने सखल भागात पाणी साचलं आहे. माथेरानच्या मालडुंगा पॉईंट येथे पावसामुळे भूस्खलन झाले आहे. यामुळे हा पाईंट पर्यटनासाठी बंद करण्यात आला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे भुस्खलन झाले आहे. सुदैवाने या ठिकाणी वस्ती नाही. यामुळे कोणतीही हानी झाली नाही.