समाधानी आयुष्यासाठी धरा आरोग्याची कास!

    27-Jul-2023
Total Views |
article on Insurance Policy


पालक त्यांच्या जवळच्या व्यक्तींचे भले व्हावे म्हणून अनेकविध भूमिका निभावतात आणि असंख्य जबाबदार्‍या पार पाडतात. त्यांचे प्रेम आणि त्यांनी घेतलेली काळजी याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच, विम्याच्या माध्यमातून त्यांच्या आरोग्याची व आर्थिक सुरक्षिततेची खात्री करणे किती महत्त्वाचे आहे हे लक्षात घेतले पाहिजे.


ई-वडील अनेकदा दुसर्‍यांची काळजी करताना स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अजाणतेपणी त्यांचे स्वास्थ्य धोक्यात येते. आरोग्य विमाचा पर्याय स्वीकारून, पालक त्यांच्या स्वत:च्या आरोग्यालाही प्राधान्य देऊ शकतील, याचा फायदा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनाही होईलच. आरोग्य चांगले असेल, तर ते त्यांच्या भूमिका उत्तमरित्या बजावत राहतील.आरोग्य विम्याचे अनेक महत्त्वपूर्ण लाभ आहेत. त्यामुळे तुमच्या आई-वडिलांचे आरोग्य आणि एकंदर कुटुंबाची सुरक्षितता राखली जाईल:

दर्जेदार सेवा अखंडितपणे उपलब्ध

आरोग्य विमा तुमच्या पालकांना दर्जेदार आरोग्यसेवा त्वरित उपलब्ध करून देतो. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत विमा संरक्षणामुळे आवश्यक ती वैद्यकीय सेवा त्वरित मिळू शकते, जलदगतीने आजारातून बरे होण्याची शक्यता वाढू शकते.

परवडण्याजोगे दर, करांमध्ये लाभ आणि आर्थिक सुरक्षितता

आरोग्य विमा आर्थिक सुरक्षितता पुरवण्याचे काम करतो. वैद्यकीय खर्चाचा मोठा वाटा विम्याद्वारे उचलला गेल्यामुळे आर्थिक भार कमी होतो. त्यामुळे आर्थिक ताण कमी होतात आणि तुमच्या आई-वडिलांना दर्जाबाबत तडजोड न करता सर्वोत्तम सेवा मिळू शकते. शिवाय, आरोग्य विमा पॉलिसी बहुतेकदा प्रचलित कर कायद्यांखाली वजावटीस पात्र असतात. त्यामुळे तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक नियोजनात एक अतिरिक्त लाभही मिळतो.

टेलर्ड सोल्यूशन्स

तुमच्या आई-वडिलांसाठी विमा योजना खरेदी करताना, तुमच्या कुटुंबाच्या विशिष्ट गरजा व परिस्थिती विचारात घ्या. बाजारात आरोग्य विमा योजनांचे अनेक प्रकार उपलब्ध असतात. सर्वसमावेशक आरोग्य विमा, फॅमिली फ्लोटर पॉलिसी आणि गंभीर आजारापासून संरक्षण देणारी विमा पॉलिसी आदी. प्रत्येक योजनेचे लाभ आणि संरक्षण पर्याय वेगवेगळे असतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आई-वडिलांसाठी त्यातली सर्वांत अनुकूल योजना निवडण्याची मुभा मिळते.

संरक्षण विस्तार आणि प्रतिबंधात्मक काळजी
 
बहुतेक आरोग्य विमा योजनांचे लाभ रुग्णालयात दाखल होण्याच्या खर्चापलीकडे जाणारे असतात. त्यात बाह्यरुग्ण सेवांचा अंतर्भाव असतो. तसेच, अतिरिक्त अ‍ॅड-ऑन सेवा असतात. त्यामुळे स्वत:च्या खिशातून कराव्या लागणार्‍या खर्चाचे प्रमाण कमी राखले जाते. शिवाय, आरोग्यविमा योजनांमध्ये प्रतिबंधात्मक काळजीची तरतूदही असते, नियमित आरोग्य तपासण्या व स्वास्थ्यांसाठी कराव्या लागणार्‍या तपासण्यांना प्रोत्साहन दिले जाते. आरोग्याबाबतच्या चिंतांचे सक्रियपणे निराकरण करून या पॉलिसी तुमच्या आई-वडिलांच्या एकंदर स्वास्थ्यामध्ये योगदान देतात.
 
आपल्या आई-वडिलांचे आरोग्य विम्याद्वारे संरक्षित करणे ही खरोखरीच एक विचारी व प्रभावी कृती आहे. आरोग्य विमा दर्जेदार आरोग्यसेवा पुरवून एकंदर स्वास्थ्याचे संरक्षण तर करतोच, शिवाय आव्हानात्मक काळात आर्थिक सुरक्षितता पुरवण्याची ग्वाहीही देऊ करतो. त्यांच्या आरोग्याला विम्याचे संरक्षण पुरवण्याचे पाऊल लवकरात लवकर उचलून, तुम्ही तुम्हाला वाटणारे प्रेम व काळजी व्यक्त करू शकता, तुमचे पालक निरोगी व चिंतामुक्त आयुष्य जगतील याची निश्चिती करू शकता. या विचारपूर्वक कृतीमुळे त्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या इच्छेला एक अर्थ प्राप्त होईल. त्यांनी तुमच्यासाठी जे काही केले, त्याबद्दल तुम्हाला वाटणारे प्रेम व कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उत्तम मार्ग आहे.



-श्रीराज देशपांडे
 
(लेखक एसबीआय जनरल इन्शुरन्समध्ये आरोग्य व्यवसाय प्रमुख आहेत.)