नवी दिल्ली : राजस्थानमध्ये सरकार चालवण्याच्या नावाखाली काँग्रेसने केवळ लुटमार आणि असून खोटेपणाचा बाजार चालवला आहे. काँग्रेसचे हे कारनामे एका ‘लाल डायरी’त नोंदवलेले असून ही डायरी उघडली तर भलेभले अडचणीत येतील, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये काँग्रेसला दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये एका जाहिर सभेस संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर कठोर शब्दात टिका केली. ते म्हणाले, राजस्थानमध्ये दलितांवरील अत्याचार शिगेला पोहोचले आहेत. अमली पदार्थांचा व्यापार फोफावत आहे. नागरिकांना सण साजरे करता येत नाहीत, कधी दगडफेक सुरू होईल आणि कर्फ्यू लागेल हे सांगता येत नाही. राजस्थानची जनता आपल्या माताभगिनींवर होणारे सहन करत आहेत. एका दलित बहिणीवर तिच्या पतीसमोर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे. राजस्थानमध्ये सरकार चालवण्याच्या नावाखाली काँग्रेसने केवळ लुटमार आणि असून खोटेपणाचा बाजार चालवला आहे. काँग्रेसचे हे कारनामे एका ‘लाल डायरी’त नोंदवलेले आहेत आणि ही डायरी उघडल्यास भलेभले नेते अडचणीत येणार आहेत, असा इशारा पंतप्रधानांनी दिला.
काँग्रेस आणि सहकारी पक्षांनी आपल्या आघाडीचे नाव बदलण्याची चाल खेळल्याचा टोला पंतप्रधानांनी लगावला. ते पुढे म्हणाले, पूर्वीच्या काळी एखाद्या पिढीची किंवा कंपनीची बदनामी झाली की लगेच नवा फलक लावला जात असे. त्या नव्या फलकाद्वारे लोकांना गोंधळात टाकून आपला धंदा चालवला जात असे. काँग्रेस पक्षही आता तेच करत असून युपीएची दुष्कृत्ये झाकली जावीत, यासाठी इंडिया हे नाव धोरण केल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या खोडसाळपणास पीएमओचे उत्तर
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधानांच्या कार्यक्रमातील त्यांचे भाषण रद्द केल्याचा आरोप करणारे ट्विट केले होते. त्यास पंतप्रधान कार्यालयाने तत्काळ प्रत्युत्तर देऊन त्यांचा आरोप खोडून काढला. पीएमओने म्हटले की, तुमच्या कार्यालयाने तुम्ही कार्यक्रमास उपस्थित राहण्यास नसल्याचे कळिले होते. आम्ही तुम्हाला यापूर्वीही पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते आणि तेथे पोहोचून तुम्ही त्या कार्यक्रमांना उपस्थिती लावली आहे. जर तुम्ही आजच्या कार्यक्रमात सामील झालात तर तुमचे स्वागत आहे. पंतप्रधान मोदी ज्या कामांचे उद्घाटन करणार आहेत, त्या कामांच्या फलकावरही तुमचे नाव लिहिले आहे. नुकत्याच झालेल्या दुखापतीमुळे तुम्हाला कोणतीही शारीरिक दुखणे नसेल तुमची उपस्थिती आमच्यासाठी अमूल्य असल्याचे पीएमओने म्हटले आहे.