राजकारण्यांची भौतिकवादी मानसिकता त्यांना लोभी, अहंकारी आणि भ्रष्ट बनवते, असा सर्वसामान्यांचा समज आहे. वाजपेयीजी, दीनदयाळजी आणि मोदींजीसारखे संघ प्रचारक जेव्हा राजकारणात वेगळ्या पद्धतीने काम करतात आणि लोकाभिमुख कारभार पाळतात, तेव्हा सर्वसामान्यांना प्रश्न पडतो की, कोणी इतका नि:स्वार्थी कसा असू शकतो?
अटलबिहारी वाजपेयी आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुसंख्य भारतीयांची भारतीयता, विकास आणि जगाबद्दलची धारणा बदलली आहे. जेव्हा संपूर्ण जग सामाजिक-आर्थिक समस्या, संघर्ष आणि पर्यावरणविषयक समस्या सोडवण्यासाठी नरेंद्र मोदीजींची मदत घेत आहे आणि त्यांच्याकडे प्रेरणा म्हणून पाहत आहे, तेव्हा या नेत्यांची साधी पार्श्वभूमी माहीत असलेल्या काही वसाहतवादी विचारसरणीच्या लोकांना हे पचवता येत नाही की, साधे जीवन जगणारी व्यक्ती एवढ्या उंचीवर कशी पोहोचू शकते? त्यांचा जागतिक नेत्यांकडून असा आदर, मार्गदर्शन आणि जगाचे नेतृत्व करावे, अशी इच्छा हे विशिष्ट विचारसरणी व भारतद्वेष्ट्यांच्या पचनी पडलेली नाही, हेच खरे.
तुम्हाला महान व्हायचे असेल आणि समाजासाठी आणि राष्ट्रासाठी काहीतरी मोठे करायचे असेल, तर तुम्ही श्रीमंत, प्रसिद्ध किंवा प्रसिद्ध कुटुंबातील आणि चांगले मोठे व्यक्तिमत्त्वच असले पाहिजे, अशी विचारसरणी सध्या प्रचलित आहे. केवळ भारतच नाही, तर संपूर्ण जग ज्या समस्यांना तोंड देत आहे, ते पूर्णपणे अशा प्रकारच्या लोकांचे आणि मानसिकतेचे परिणाम आहेत आणि तेव्हा वाजपेयीजी आणि मोदींजीसारख्या नेत्यांनी इतकी साधी पार्श्वभूमी असूनही, तळागाळात ठोस काम करून एक चांगला मार्ग दाखवला आहे. त्यांचे प्रचारक म्हणून इतके खडतर जीवन की, कोणीही स्वतःसाठी किंवा त्यांच्या मुलांसाठी अशी इच्छा बाळगणार नाही.
या नेत्यांची थोडक्यात पार्श्वभूमी पाहूया...
दोघांनीही आपल्या आयुष्याचा मोठा भाग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक (देशासाठी आपले जीवन समर्पित करणारे देशभक्त) म्हणून व्यतीत केला, हे आपण जाणतोच. जर आपण भौतिक जगाचा विचार केला, तर संघ प्रचारकाचे जीवन थोडे वेगळे असते. ते ज्या जीवनशैलीचे नेतृत्व करतात, ते आपल्यापैकी बहुतेकांना अनुकरण करणेही कठीण वाटते. त्यांच्या शरीरातील प्रत्येक पेशी समाजाच्या आणि संपूर्ण राष्ट्राच्या हितासाठी ऊर्जा उत्सर्जित करते.
प्रचारक हा केवळ एक पूर्णवेळ संघ स्वयंसेवक असू शकतो, जो एकावर्षापेक्षा जास्त काळ सक्रिय आहे. इतर आवश्यकतांमध्ये अविवाहित राहणे, उच्च दर्जाची स्वयंशिस्त आणि संघटनेवरील संपूर्ण निष्ठा यांचा समावेश होतो. सर्व प्रकारच्या सांसारिक सुखांची माहिती असूनही, एखादा तरुण प्रचारक बनण्याचा निर्णय घेतो, जेव्हा समाजातला दुसरा मोठा घटक मात्र क्षणिक आनंद आणि समाधानासाठी ऊर्जा आणि वेळ घालवत असतो. त्याचवेळी संप्रेरकांमुळे लैंगिक आवेग आणि आकर्षण वाढत असताना आणि प्रचारकाला समाजात आयुष्य घालवावे लागत असताना, इतक्या लहान वयात, अशा तीव्र इच्छा आणि भावनांपासून दूर कसे राहायचे? हे खरंच इतकं सोपं आहे का? तथापि, प्रचारकासाठी ते नैसर्गिक आणि सहज आहे. कारण, त्यांनी मोठ्या दृष्टिकोनातून भारतीयत्व स्वीकारलेलं असतं. ज्या युगात तुम्ही सहज पैसाकेंद्रित जीवन जगू शकता, आलिशान बाह्यकेंद्रित जीवनशैली, मोठी गाडी, बंगला खरेदी करू शकता आणि भौतिकवादी, चंगळवादी जीवनाचा आनंद घेऊ शकता, प्रचारक पगाराशिवाय माफक जीवन जगणे स्वीकारतो.
उदरनिर्वाहासाठीही त्यांना इतर स्वयंसेवकांच्या घरावर अवलंबून राहावे लागते. जेवणात जे काही मिळेल, ते देवाचा प्रसाद म्हणून ते आनंदाने स्वीकारतात. वाजपेयीजी आणि मोदीजींच्या प्रचारकांच्या कार्यकाळात त्यांना अनेकदा अनेक किलोमीटर पायी चालत किंवा सायकल चालवूनही जेवण मिळत नसे, तरीही त्यांच्या चेहर्यावर नाराजीचा भाव नव्हता. राहण्याची व्यवस्थाही साधी असते. ते माध्यमांच्या प्रकाशझोतापासून दूर राहतात. एक सामान्य व्यक्ती त्यांच्या निवडलेल्या मार्गात किंवा क्षेत्रात समाजात सकारात्मक, चिरस्थायी बदल घडवून आणण्याची शक्ती कशी बनू शकते? प्रचारकाच्या जीवनात डोकावून हे समजून घेतले पाहिजे.
सरसंघचालकांव्यतिरिक्त दत्तोपंत ठेंगड, दीनदयाळ उपाध्याय, नानासाहेब देशमुख आणि इतर अनेक प्रचारकांनी आपले जीवन समर्पित केले आणि समाजासाठी मोठे योगदान दिले. भौतिक जगाच्या तुलनेत हे जीवन कठीण आणि अविश्वसनीय दिसते. तथापि, प्रचारकांच्या जीवनात कालांतराने होणारे आंतरिक बदल आकलनाच्या पलीकडे आहेत, असे म्हटले तर वावगे ठरु नये. हे संक्रमण वरचेवर होत नाही. उलट, तो आंतरिक स्रोत आहे, जो एखाद्याला मत्सर, क्रोध, आसक्ती, वासना आणि अहंकारी वृत्ती या दुर्गुणांपासून बदलतो आणि मुक्त करतो. या व्यक्तींची ऊर्जा राष्ट्राच्या परम वैभवाच्या विशिष्ट ध्येयाकडे निर्देशित करते, कधीही न थांबता! ही स्पष्टता अद्भुत नेतृत्व गुण आणते. जसे की, अत्यंत वाईट परिस्थितीतही शांत राहणे आणि संयोजित राहणे आणि गुणात्मकरित्या काम करणे, दिवसाचे २४ तास, आठवड्याचे सात दिवस. जरी पंतप्रधान मोदी हिंदू धर्मावर आधारित विचारसरणीचे अनुसरण करतात, हे आंतरराष्ट्रीय नेत्यांना माहीत असले, तरी ते त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. कारण, ही विचारधारा भारतात कसा सकारात्मक बदल घडवून आणत आहे आणि जगाला सुधारण्याससुद्धा निःसंशयपणे मदत करेल, हे सर्वांना समजले आहे.
आपण अनुभवतोय, बर्याच परिस्थितींमध्ये, वरवरचे विकसित व्यक्तिमत्त्व, केवळ बाह्य गुणांचे प्रकटीकरण जे अनिवार्यपणे हानिकारक असतात. संपूर्ण जगाला केवळ या दिखाव्याच्या मानसिकतेमुळे अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. कारण, अशा लोकांनी कधीही वैयक्तिक आणि वैश्विक अस्तित्वाच्या अपरिवर्तनीय आंतरिक स्रोतावर काम केले नाही किंवा लक्ष दिले नाही. महान व्यक्ती होण्यासाठी तुम्हाला या आंतरिक प्रक्रियेतून जावे लागते. समाजात वावरताना आणि कार्य करताना प्रचारक या प्रक्रियेतून जातात. नियमितपणे ते वेगवेगळ्या अनुभवांसह वेगवेगळ्या लोकांना भेटतात. काही अनुभव अप्रिय असतात, तर काही आनंददायी असतात. परंतु, त्यांच्याशी वागताना ते शांत, समानतेची भावना आणि आत्मीय वर्तन अंगीकारतात. ते पृथकरणासह जोड (Attachment with Detachment) या मूलभूत कल्पनेला मूर्त रूप देतात.
विशेषतः राजकारण्यांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन संशयास्पद आहे आणि जगभरातील बहुतेक लोकांचा राजकारण्यांवर विश्वास नाही. राजकारण्यांची भौतिकवादी मानसिकता त्यांना लोभी, अहंकारी आणि भ्रष्ट बनवते, असा सर्वसामान्यांचा समज आहे. वाजपेयीजी, दीनदयाळजी आणि मोदींजीसारखे प्रचारक जेव्हा राजकारणात वेगळ्या पद्धतीने काम करतात आणि लोकाभिमुख कारभार पाळतात, तेव्हा सर्वसामान्यांना प्रश्न पडतो की, कोणी इतका नि:स्वार्थी कसा असू शकतो? कुटुंबासाठी कोणताही अजेंडा नाही, महान दृष्टी आहे आणि कोणतीही विश्रांती न घेता प्रत्यक्षात कार्य अमलात आणणे, विध्वंसक टीका होत असतानाही देशासाठी एवढं समर्पण, सामान्य माणसाशी थेट संबंध. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रमाणे वैयक्तिक आणि राष्ट्रीय चारित्र्य विकसित केल्याने जगभरात सकारात्मक बदल घडू शकतात, हे लोकांना समजू लागले आहे.
या महान नेत्यांच्या निर्णयांशी किंवा विचारसरणीशी तुम्ही सहमत असाल किंवा असहमत असाल; पण भारतमातेबद्दलच्या त्यांच्या भक्तीवर शंका घेतली जाऊ शकत नाही. अशा नेत्यांना भारतीयतेच्या आधारावर राष्ट्राचा कायापालट करण्यासाठी मोठ्या पाठिंब्याची गरज आहे आणि समाजातील प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी व भारतीयतेला बळ देण्यासाठी अशा आणखी प्रचारकांची गरज आहे. परिणामी, आपण तरुणांना किमान काही वर्षांसाठी प्रचारकाची भूमिका निवडण्यास प्रोत्साहित केले पाहिजे.
वैयक्तिक आंतरिक विकास = राष्ट्रीय आणि जागतिक विकास, हे सूत्र त्यासाठी लक्षात घ्यावे लागेल.