खानिवडे : वसईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने अधून मधून हजेरी लावत काहीशी उसंत घेतल्यामुळे शेतीकामांना वेग आला आहे. अनेक शेतांमध्ये मोठा ट्रॅक्टर , पॉवर टिलर यांच्या आवाजाने शेत शिवार गजबजून गेले आहेत .यंदा सतत पडणाऱ्या पावसामुळे वसईतील आवण्या लांबणीवर पडल्या आहेत .त्यामुळे जमेल तशी आवणी उरकण्याची घाई शेतकरी करू लागले आहेत .यंदा जवळ पास निम्म्या आवण्या उरकत आल्या असून उरलेल्या आवणीसाठी भात खाचरात शेतकरी आणि मजूर यांची लगबग सुरू आहे.