नवी दिल्ली : सीमा हैदरच्या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे. प्रत्यक्षात दहशतवाद्यांना निधी पुरवण्यासाठी कुख्यात असलेल्या पाकिस्तानच्या हबीब बँकेशी सीमाचे संबध असल्याचे समोर आले आहे. नेपाळमधील हबीब बँकेच्या माध्यमातून सीमाशी संपर्क साधला जात होता. तसेच त्या बँकेच्या माध्यमातून सीमाला मदत ही केली जात असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानची हबीब बँक आणि नेपाळची हिमालयन बँक यांचा परस्पर करार झाला आहे. यामुळे पाकिस्तानी हबीब बँकेने हिमालय बँकेच्या सहकार्याने नेपाळमध्ये आपल्या शाखा उघडल्या. अमेरिकेत हबीब बँकेवर अल कायदासारख्या मोठ्या दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत केल्याचा आरोप आहे.
पाकिस्तानची हबीब बँक आणि नेपाळची हिमालयन बँक यांची परस्पर भागीदारी आहे. या भागीदारीत, हबीब बँक आणि हिमालयन बँक ऑफ नेपाळच्या शाखा देशाच्या विविध भागात सातत्याने सुरू होत आहेत. गुप्तचर प्रकरणाशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की , सीमा नेपाळमध्ये राहिल्यानंतर ती स्थानिक पातळीवर काही लोकांना भेटली. तसेच नेपाळमधील सीमेवर भेटलेल्यांमध्ये हबीब बँकेशी (हिमालयन बँक) संबंधित लोक होते का, याचा तपास आता गुप्तचर संस्था करत आहेत. तपास यंत्रणांशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की सीमाचे पैशांचे व्यवहार हबीब बँकेतूनच झाले होते. दहशतवादी कारवाया करण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या हबीब बँकेशी संबंधित लोकांचे नेटवर्क आणि सीमाचे नेपाळ सीमेजवळ भेटण्याच्या प्रकरणाचा तपास घेतला जात आहे, असे गुप्तचर तज्ज्ञांचे मत आहे.
नेपाळमध्ये दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी हबीब बँकही गुप्तचर संस्थांच्या निशाण्यावर आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि उत्तर प्रदेश पोलिसांचे माजी महासंचालक डॉ. विक्रम सिंग म्हणतात की , सीमाला नेपाळमधील हबीब बँकेच्या सहकार्याने काम करणाऱ्या हिमालयन बँकेकडून मदत मिळत होती का याची चौकशी व्हायलाच हवी. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमाचे पाकिस्तानातील बँक खाते हबीब बँकेत आहे. आंतरराष्ट्रीय व्यवहारांच्या संदर्भात, हबीब बँक आपल्या खातेदारांना जगातील ज्या देशांमध्ये त्यांनी स्थानिक बँकांशी करार केला आहे त्यांना व्यवहाराची सुविधा देखील प्रदान करते.
त्यामुळे माजी अधिकारी विक्रम सिंह म्हणतात की, हबीब बँकेच्या भागीदारीत ज्या पद्धतीने हिमालयन बँकेने नेपाळमध्ये आपल्या शाखांचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे ती सामान्य घटना नाही. ते म्हणतात की या बँकांनी पूर्वी नेपाळ-भारत सीमा भागात अधिक वेगाने त्यांच्या शाखा उघडण्यास सुरुवात केली आहे.नेपाळमध्ये दहशतवादी निधीसाठी बदनाम झालेल्या पाकिस्तानी बँकेच्या उपस्थितीचा स्पष्ट अर्थ असा आहे की ती नेपाळला दहशतवादी कारवाया करण्यासाठी मोठे लॉन्चिंग पॅड म्हणून वापरत आहे.
खरं तर, नेपाळमधील हबीब बँक आणि हिमालयन बँक यांच्यातील करारावर संरक्षणाशी संबंधित तज्ञ आधीच प्रश्न उपस्थित करत आहेत. गुप्तचर संस्थांशी संबंधित असलेले वरिष्ठ अधिकारी डॉ. एस.एन. औजला सांगतात की, हबीब बँकेने नेपाळमधील हिमालयन बँकेशी सुमारे अडीच दशकांपूर्वी करार केला होता, तेव्हापासून भारताच्या शेजारील देशात आपले स्लीपर सेल सक्रिय करण्याचा पाकिस्तानचा इरादा ठरला होता.
तसेच औजला सांगतात की, गेल्या काही वर्षांत पाकिस्तानच्या हबीब बँकेने भारत, श्रीलंका, नेपाळ आणि चीन या तिन्ही शेजारी राष्ट्रांमध्ये आपल्या शाखा उघडल्या आहेत. या शाखा उघडण्यामागे बँकिंग प्रणालीद्वारे मनी लाँड्रिंग करणे आणि पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या स्लीपर सेलला आर्थिक मदत करणे हा प्रमुख हेतू आहे, असे ही ते म्हणाले. त्याचबरोबर औजला म्हणाले की, सीमाने नेपाळला भारतात प्रवेश करण्यासाठी ज्या पद्धतीने निवडले ते तेथे स्लीपर सेलच्या उपस्थितीमुळे होते. त्यामुळे सीमा आणि बँकेमधील परस्पर संबध तपासायला हवेत.