अंबरनाथ : अंबरनाथच्या चिखलोली धरणावर जाण्यास नागरिकांना मनाई करण्यात आली आहे, त्याबाबतचा फलक शिवाजीनगर पोलिसांतर्फे धरण क्षेत्रात लावण्यात आला आहे. दरवर्षी पावसाळ्यात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी अंबरनाथ जवळील चिखलोली धरण परिसरात पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावतात, शनिवारी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी पहावयास मिळते.
मात्र, लघु पाटबंधारे खात्यामार्फत चिखलोली धरणाची उंची वाढवण्याचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे, त्यामुळे धरणाच्या बुडीत क्षेत्रात खोडकामामुळे खड्डे निर्माण झाले आहेत, खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने गंभीर दुर्घटना घडण्याची भीती आहे, त्यामुळे धरणावर जाण्यास सर्व नागरिकांना जाण्यास मनाई करण्यात आल्याचा फलक शिवाजीनगर पोलिसांनी लावला आहे. तरीही कुणी नागरिक आढळल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा शिवाजीनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिला आहे.