विराट कोहलीच्या नावावर ७६ आंतरराष्ट्रीय शतके; दिग्गज सचिनकडून कौतुक

    22-Jul-2023
Total Views |
Sachin Tendulkar's Instagram story for Virat Kohli

मुंबई
: भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. त्यातच त्याने सचिन तेंडुलकरच्या १०० शतकांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे. दरम्यान, सचिन तेंडुलकरने स्वतः विराट कोहलीच्या या खेळीचे कौतुक केले आहे. खुद्द विराटच्या पत्नीने देखील त्याचे कौतुक करत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

या सामन्यात विराट कोहलीने १२१ धावांची भारताकरिता बहुमुल्य खेळी केली. या शतकी खेळीमुळे विराटच्या आंतरराष्ट्रीय शतकांची संख्या तब्बल ७६ इतकी झाली आहे. तसेच, विराट कोहलीचे हे कसोटीतले २६ वे शतक ठरले. दरम्यान, या शतकी खेळीबरोबरच कोहलीने परदेशात कसोटी शतकासाठी जवळपास पाच वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे.

दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडिच यांच्यात चौथ्या दिवसाचा खेळ सुरु होण्यास विलंब होणार असून पावसाच्या व्यत्ययामुळे चौथ्या दिवसाचा खेळ सुरु होण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारताने आपला पहिला डाव ४३८ धावांवर आटोपला असून विंडीजने पहिल्या डावास सुरुवात केली असून १ गडी बाद झाला असून ८६ धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिजकडून ब्रेथवेट आणि मॅकेंझी खेळत असून ३५२ धावांनी विंडीज अद्याप पिछाडीवर आहे.