इस्लाम धर्मानुसार जगण्यासाठी 'या' महिला खेळाडूने घेतली निवृत्ती

    21-Jul-2023
Total Views |
aayasha 
 
मुंबई : पाकिस्तानची क्रिकेटर आयशा नसीमने क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आता ती इस्लामनुसार आपले जीवन जगणार असल्याचे तिने सांगितले. आयशा नसीमचे वय अवघे १९ वर्ष आहे. तिने आपल्या निवृत्तीची माहिती 'पाकिस्तान क्रिकेट बोर्ड'ला दिली आहे.
 
निवृत्त होण्याच्या निर्णयावर बोलतांना ती म्हणाली, “मी क्रिकेट सोडत आहे आणि मला माझे जीवन इस्लामनुसार जगायचे आहे. आयशा नसीमचा जन्म ७ ऑगस्ट २००४ रोजी अबोटाबाद येथे झाला होता. आयशा नसीम उजव्या हाताची फलंदाज असण्यासोबतच ती मध्यम गतीने वेगवान गोलंदाजीही करते.
 
मार्च २०२० मध्ये तिने टी-२० मध्ये पदार्पण केले होते. या वर्षी फेब्रुवारीमध्ये तिने भारताविरुद्ध नाबाद ४३ धावांची खेळी केली होती. आयशा नसीममध्ये मोठे फटके मारण्याच्या क्षमतेमुळे पाकिस्तानच्या महिला क्रिकेटचे भविष्य म्हणून पाहिली जात होते. तिने वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121