मुंबई : विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या शिक्षण विभागा अंतर्गत २३ जुलै रोजी सकाळी १० वाजता वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन भायखळा पूर्व येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृह येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा तर प्रमुख पाहुणे म्हणून नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर उपस्थित राहणार आहेत.
या प्रसंगी शालांत परीक्षेत मंडळातून सर्वप्रथम आलेल्या शंतनू पावसकर तसेच शैक्षणिक, कला, क्रीडा पारितोषिक पात्र विद्यार्थ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या लेखणीतून तयार झालेला प्रणाम हस्तलिखित आणि शारदास्मृती या जाहिरात अंकाचे प्रकाशन आणि विवेकानंद स्मृती या जाहिरात अंकाच्या दर पत्रकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल.
या मुख्य कार्यक्रमानंतर मंडळाच्या कलाविभागामार्फत दिलीप प्रभावळकर लिखित आणि गणेश जाधव दिग्दर्शित हसवा फसवी हे दोन अंकी नाटक सादर केले जाणार आहे. या कार्यक्रमास मंडळाच्या सर्व माजी विद्यार्थी सभासदांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंडळ प्रमुख सागर बोने आणि शिक्षण प्रमुख साहिल पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा; साहिल पाटील – ९०७६३५९४१६