नवी दिल्ली : सीमा हैदर आणि सचिन अचानक गायब झाल्याचे वृत्त समोर आले आहे. गेल्या ३६ तासांपासून सीमा आणि सचिन मीणा गायब आहेत. पब्जी खेळताना सचिनवर प्रेम झाल्यानंतर सीमा पाकिस्तानच्या कराचीतून आपल्या चार मुलांसह नेपाळमार्गे भारतात आली होती, असा दावा तिने केला होता.त्यानंतर तिने सचिन मीनासोबत हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले.यानंतर त्यांचे व्हि़डिओ व्हायरल झाले आहेत. ग्रेटर नोएडा या ठिकाणी ते राहत होते.
मात्र आता त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नसल्याचे सांगितले जात आहे. युपी एटीएसने यासंदर्भात चौकशी सुरू केली आहे. एटीएस हायटेक तंत्रज्ञानाने सीमेवर चौकशी करणार आहे. तसेच पाकिस्तानच्या कराचीहून नेपाळमार्गे नोएडाला पोहोचलेली सीमा हैदर ही आयएसआय एजंट असल्याचा संशय आहे.
पोलीस दल आणि सुरक्षा यंत्रणांना सीमा हैदरच्या प्रकरणाची पूर्ण माहिती आहे. अलीकडेच सीमाला पाकिस्तानी गुप्तहेर असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली होती. मात्र, नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. त्यानंतर ती गायब झाल्याचे वृत्तसमोर येत आहे.