नवी दिल्ली : फ्रान्सच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएईमध्ये पोहचले. यूएईमध्ये पंतप्रधान मोदी अबुधाबी विमानतळावर उतरले. तिथे त्यांचे राजकुमार एचएच शेख खालिद बिन मोहम्मद यांनी स्वागत केले. याशिवाय, UAE ने पंतप्रधानांचे स्वागत करताना सर्वात खास गोष्ट केली ती म्हणजे बुर्ज खलिफा वर तिरंग्यांचे चित्र प्रदर्शित केले.
UAE ने जगातील सर्वात मोठी इमारत बुर्ज खलिफावर तिरंग्यासह पंतप्रधान मोदींचे छायाचित्र दाखवल्याचे एका व्हिडीओमध्ये दिसत आहे. तसेच त्यात लिहलेले होते की,'माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे स्वागत' त्यामुळे हे फोटो पाहून प्रत्येक भारतीयाला सन्मान वाटते आहे.
यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, पीएम मोदी यूएईला पोहोचले आणि @cop28_UAE चे अध्यक्ष आणि अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनीचे ग्रुप सीईओ यांच्याशी अर्थपूर्ण बैठक झाली. PM मोदींनी COP-28 ला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आणि नंतर UAE अध्यक्षांची भेट घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
याआधी ही ऑगस्ट २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी UAE ला पहिला दौरा केला होता. त्यानंतर पंतप्रधानांचा हा ५वा यूएई दौरा आहे.UAE ला जाण्याआधी पंतप्रधान म्हणाले होते- “मी माझे मित्र, संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष आणि अबू धाबीचे शासक, महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांना भेटण्यास उत्सुक आहे.” ते पुढे म्हणाले, “दोन्ही देश व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, अन्न सुरक्षा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, शिक्षण, फिनटेक, संरक्षण, सुरक्षा आणि मजबूत लोक-लोक संबंध यासारख्या विस्तृत क्षेत्रात गुंतलेले आहेत. गेल्या वर्षी, झायेद आणि मी आमच्या भविष्यातील भागीदारीसाठी रोडमॅपवर सहमत झालो. आता संबंध आणखी दृढ करण्याबद्दल बोलूया.