कोकण रेल्वेवर भारत-नेपाळ रेल्वे लिंक तयार करण्याची मोठी जबाबदारी!

    12-Jul-2023
Total Views | 98

Konkan Railway 
 
 
मुंबई : महाराष्ट्राचा अभिमान असलेली कोकण रेल्वे आता दोन देशांमध्ये रेल्वे लिंक जोडण्याचे काम करणार आहे. भारत-नेपाळदरम्यान रेल्वे लिंक तयार करण्याची एक मोठी जबाबदारी कोकण रेल्वेवर सोपवण्यात आली होती. भारत-नेपाळमधील दळणवळण यंत्रणा सक्षम करून व्यापार आणि वाणिज्य व्यवहार वाढवण्यासाठी रेल्वे लिंक तयार करण्याची जबाबदारी कोकण रेल्वेला देण्यात आली.
 
भारतातील रक्सोलपासून नेपाळमधील काठमांडूपर्यंत ब्रॉंडगेज रेल्वेमार्ग निर्मितीचा महत्वाकांक्षी प्रकल्प दोन्ही देशांच्या मान्यतेने हाती घेण्यात आल्याची घोषणा गतवर्षच करण्यात आली होती. रक्सोल ते काठमांडू या २४३ कि.मी. मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले होते. अंतिम अहवालानुसार १३६ किमी मार्गाला स्वीकृती मिळाली आहे. आव्हानात्मक प्रकल्प हाताळण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचीच यासाठी निवड करण्यात आली आहे. त्यानुसार कोकण रेल्वेने या मार्गाचा अंतिम प्रकल्प अहवाल नुकताच सादर केला आहे. नेपाळ रेल्वे, कोकण रेल्वे यांच्याकडून संयुक्तपणे या मार्गाचे बांधकाम केले जाणार आहे. सुमारे ५ वर्षात हा मार्ग कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121