मुंबई : झी मराठी वाहिनीवरील लोकमान्य ही मालिका अल्पावधितच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. आता त्या जागी ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’चं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचा पहिला प्रोमो आज समोर आला असून हा नवीन कार्यक्रम ९ ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार प्रसारित केला जाणार आहे.
‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’च्या आधीच्या पर्वाचं परिक्षण आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, रोहित राऊत, मुग्धा वैशंपायन आणि कार्तिकी गायकवाड यांनी केलं होतं, तर अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने सुत्रसंचालन केले होते. आता या नव्या पर्वाचं परिक्षण कोण करणार आणि याचं सूत्रसंचालक म्हणून कोण दिसणार हे अजून गुलदस्त्यात आहे.
‘लोकमान्य’ ही मालिका लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित आहे. या मालिकेत अभिनेता क्षितिष दाते याने लोकमान्य टिळकांची भूमिका साकारली आहे, तर अभिनेत्री स्पृहा जोशीने लोकमान्य टिळकांची पत्नी सत्यभामाबाई यांची भूमिका साकारली आहे.