जयपूर : राजस्थानचे मंत्री आणि काँग्रेस नेते राजेंद्र गुडा यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त विदान केले आहे. यावेळी त्यांनी भगवान श्री राम आणि माता सीता यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राजेंद्र गुडा म्हणाले- 'सीता अतिशय सुंदर होती, तिच्या सौंदर्यामागे भगवान राम आणि रावण वेडे होते.' तसेच माता सीतेच्या गुणांशी स्वतःची तुलना करून राजेंद्र गुडा पुढे म्हणाले की, आज मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट माझ्या गुणांमुळे माझ्यामागे धावत आहेत.
राज्यमंत्री राजेंद्र गुडा यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ गुढगौडजी सीएचसी येथे डिजिटल एक्सरे मशीनच्या उद्घाटन समारंभातील आहे. ज्यामध्ये माता सीतेच्या सौंदर्याची कल्पनाही करता येणार नाही, असे म्हणताना गुडा म्हणाले की, सीतेच्या आकर्षणामुळेच श्री राम आणि रावण सारखे अद्भुत पुरुष त्यांच्या मागे वेडे झाले होते. त्यामुळेच त्यांच्या सौंदर्याची कल्पनाही करता येत नाही.
त्याचप्रमाणे आजकाल गेहलोत आणि पायलट दोघेही माझ्यामागे धावत आहेत, त्यामुळे माझ्यात काही तरी गुणवत्ता असली पाहिजे. यावेळी गुडा यांना कोणत्या पक्षाकडून तिकीट मिळणार याची चर्चा आजकाल लोकांमध्ये सुरू असल्याचे गुडा यांनी सांगितले. मला त्या लोकांना सांगायचे आहे की, मला माझ्या कृतीमुळे आणि चेहऱ्यामुळे मते मिळतात. कोणत्याही पक्षाच्या चिन्हामुळे नाही.
भाजप नेते शहजाद यांनी केला हल्लाबोल
राजेंद्र गुडा यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी गुढा यांचे वक्तव्य धक्कादायक आणि अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे. पूनावाला यांनी ट्विट करून लिहिले- अशोक गेहलोत यांच्या मंत्र्याचे म्हणणे आहे की, सीतेच्या सौंदर्यामागे भगवान राम ‘वेडा’ होते. हाच काँग्रेसचा खरा हिंदुविरोधी चेहरा आहे. काँग्रेसने त्यांना बडतर्फ करावे.