जबरदस्तीने ख्रिस्तीकरणासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न
तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल : जागरूक मागासवर्गीय कुटुंबाकडून धर्म प्रचाराला विरोध
11-Jul-2023
Total Views | 101
पुणे : प्रभू येशू तारणहार आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा असे सांगत जबरदस्तीने बायबल वाचून दाखवत देवदेवतांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी तिघाजणांविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जबरदस्तीने गोरगरिबांना फूस लावून ख्रिस्ती धर्माकडे वळविण्याचा प्रयत्न जागरूक मागासवर्गीय कुटुंबामुळे फसला. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे.
रुथ संतोष कामटे (वय 34 रा. भोरडेनगर, थेरगांव), पुजा राजेश कलाल (वय 27, रा. अष्ठविनायक कॉलनी, वाकड), चांदणी शिमॉन राठोड (वय 34, रा. अष्ठविनायक कॉलनी, वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत. याप्रकरणी उषाबाई शिवाजी कांबळे (वय 39, रा. अंकुर कॉलनी, रहाटणी) यांनी फिर्याद दिली आहे. कांबळे या पतीसह राहतात. त्या धुणी भांडे, फरशी पुसणे अशी सोसायट्यांमध्ये कामे करतात. त्यांच्या शेजारी बहीणीचा मुलगा सर्जेराव भगवान कांबळे, त्याची पत्नी चेतना सर्जेराव कांबळे, त्यांची एक वर्षाची लहान मुलगी राहते. साधारण 15 दिवसांपुर्वी घरासमोर बसलेल्या असताना आरोपी महिला तेथे गेल्या. त्यांची विचारपुस केली. त्यांनी मी लातूर जिल्ह्यातील असल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर या तिघीनी त्या देखील लातूरच्या असल्याची बतावणी केली.
वाचता वगैरे येते का असे विचारले. त्यांच्याकडे असलेले पुस्तक वाचून दाखवत येशुची द्यायला सुरुवात केली. त्यावर विश्वास ठेवण्यास सांगितला. कांबळे यांनी त्यांना निघून जायला आणि परत येऊ नका सांगितले. १ जुलै रोजी त्या व भाचा, सून गप्पा मारत बसलेले असताना त्या तिघी महीला पुन्हा आल्या. त्यांच्याकडील मोबाईल दाखवुन त्यामधील चर्चचे फोटो वगैरे दाखवायला सुरुवात केली. बायबल विषयी माहीती सांगुन येशुवर विस ठेवा, येशुला माना असे सांगुन विश्वास बसत नसेल तर तुम्हाला चर्च सुध्दा दाखवु असे बोलल्या. तेव्हा त्यांना तुम्ही हे काय सांगु नका हे आम्हाला कळत नाही. आम्हाला इतर देव देवतांबद्दल सांगा असे सांगितले. तर त्यांनी इतर देवतांबद्दल माहीती नसल्याचे सांगितले.
कांबळे त्यांना यापुढे तुम्ही आमच्याकडे येऊ नका असे स्पष्ट सांगुन टाकले. त्यावेळी त्या तिघीही निघुन गेल्या. त्यानंतर सोमवारी दुपारी त्या पुन्हा आल्या. त्या तिघी महीला पुन्हा त्यांच्या घरात घुसल्या. त्यांनी पुन्हा बायबल दाखवुन तुम्ही येशुला माना, येशुवर विश्वास ठेवा असे सांगुन मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. कांबळे यांना घरातून बाहेर जाण्यास सांगितले. परंतु, त्या जात नव्हत्या. त्यावेळी कांबळे यांनी बाहेर जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांनीही बाहेर जाऊ दिले नाही. तुम्ही बायबल बघा, त्यामध्ये यशुविषयी माहीती सांगितली आहे. असे म्हणत पुन्हा येशुविषयी माहीती सांगण्यास सुरुवात केली. सर्जेराव हा घरात आला अडता त्यालाही बायबल विषयी व येशुविषयी माहीती सांगण्यास सुरुवात केली.
त्याने काहीही ऐकून घेण्यास नकार देऊन निघून जाण्यास सांगितले. या महिला जात नसल्याने त्याने पोलीस नियंत्रण कक्षात फोन केला. त्यादरम्यान, आसपासचे लोक जमा झाले. थोडया वेळातच पोलीस देखील आले. त्यांनी या महिलांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.