मुंबई : राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे हे आपल्या पक्ष संघटनेत व्यस्त आहेत. यासाठी ठाकरे महाराष्ट्र दौरा करत आहेत. यावेळी ठाकरेंनी पक्ष फोडलीत, घर फोडलीत असा वारंवार आपल्या भाषणात उल्लेख केला. मात्र, स्वत: सत्तेत असातना ठाकरेंनी आरजे मलिष्का, अभिनेत्री कंगना रणौत, खासदार नवनीत राणा, केतकी चितळे या महिलांची घरं फोडली. त्यामुळे या सर्वाचा ठाकरेंना विसर पडला का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
'मुंबई की रानी' या नावाने प्रसिद्ध असलेल्या रेडएफएमच्या आरजे मलिष्काने बीएमसीच्या कामकाजावर गाणे गायले. या गाण्यापासून उद्धव ठाकरेंपासून ते संपूर्ण शिवसेना हादरली. मलिष्काच्या 'मुंबई माझ्या सांग गोड बोल' म्हणजेच मुंबई तू मेरे साथ मीठा बोल या गाण्यानंतर तिच्यावर कारवाई करण्यात आली. शिवाय, ठाकरे सरकारच्या काळात मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कंगनाच्या घराचा काही भाग पाडला होता.
यासोबत, मराठी अभिनेत्री केतकी चितळे सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि अपमानास्पद पोस्ट अपलोड केल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले. हनुमान चालिसा पठण केल्याप्रकरणी नवनीत राणा यांच्यावर कारवाई करण्यात आली. हे सर्व ठाकरे सत्तेत असताना घडलं. पण आता तेच घर फोडलीत, गद्दार, नामर्द असा उल्लेख सतत आपल्या भाषणात करताना दिसत आहे.