वर्षा गायकवाड मुंबई काँग्रेसच्या नव्या अध्यक्षा; भाई जगताप यांची उचलबांगडी
09-Jun-2023
Total Views | 67
मुंबई : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी आमदार वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसच्या हायकमांडकडून याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंनी गुजरात, पुद्दुचेरी आणि मुंबई या प्रदेशांकरिता नव्या अध्यक्षांची नेमणूक केली आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप होते. त्यांची या पदावरून आता उचलबांगडी करण्यात आली असून आ. वर्षा गायकवाड या मुंबई प्रदेश काँग्रेसच्या नवनिर्वाचित अध्यक्ष असतील. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी मुंबई काँग्रेसमध्ये हा बदल करण्यात आला आहे.