ना फोन-ना मिडीयाशी संवाद! याच अटीवर सात तासांसाठी मिळणार जामीन!

    03-Jun-2023
Total Views | 1804
aap-leader-manish-sisodia-delhi-high-court-bail-wife-admitted-in-hospital

नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेले आम आदमी पक्षाचे (आप) ज्येष्ठ नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने दि. ३ जून रोजी सिसोदियांना आजारी पत्नीला भेटण्यासाठी ७ तासांसाठी जामीन मंजूर केला आहे. त्यांची पत्नी सीमा सिसोदिया यांची प्रकृती खालावली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचवेळी मनीष सिसोदिया तुरुंगातून घरी पोहोचले आहेत.

सीमा सिसोदिया यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर मनीष सिसोदिया आपल्या घरी पोहोचले, मात्र पत्नीला भेटू शकले नाहीत. सीमा सिसोदिया यांना घरी पोहोचण्यापूर्वीच रुग्णालयात दाखल करावे लागले. सीमा यांना जवळच्या राम मनोहर लोहिया हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.


दिल्ली उच्च न्यायालयाने २ जून रोजी मनीष सिसोदिया यांच्या अंतरिम जामिनावरील निर्णय राखून ठेवला. मात्र त्यांना दि. ३ जून रोजी सकाळी १० ते सांयकाळी ५ वाजेपर्यत सुरक्षा कोठडीत आपल्या आजारी पत्नीला भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. या दरम्यान मोबाईल वापरण्यास आणि मीडियाला प्रतिक्रिया मज्जाव करण्यात आला आहे. हायकोर्टाने त्याला फक्त कुटुंबाशी बोलण्याची मुभा दिली आहे. त्यांना मोबाईल आणि इंटरनेट वापरू नका असे सांगण्यात आले आहे. यासोबतच न्यायालयाने मनीष सिसोदिया यांना त्यांच्या पत्नीचा वैद्यकीय अहवाल ३ जून रोजी संध्याकाळपर्यंत न्यायालयात सादर करण्यास सांगितले आहे.

मनीष सिसोदिया यांची पत्नी सीमा सिसोदिया या जीवघेण्या आजाराने त्रस्त आहेत. त्याला मल्टिपल स्क्लेरोसिस आहे. या आजारात माणसाचा मेंदू आणि पाठीचा कणा निकामी होतो. हे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करते, ज्यामुळे पीडित व्यक्तीचे शरीरावर नियंत्रण नसते.मनीष सिसोदिया यांच्या घरात त्यांच्या पत्नीशिवाय दुसरे कोणीही नाही. त्यांना एक मुलगा आहे, जो शिक्षणासाठी परदेशात राहतो. मनीष सिसोदिया म्हणाले होते की, पत्नीची काळजी घेणारा ते एकमेव व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांनी जामिनासाठी अनेकवेळा न्यायालयात दाद मागितली होती.


अग्रलेख
जरुर वाचा
रशिया केंद्रित तटस्थता आणि स्वनेतृत्वाखालील महासत्ता

रशिया केंद्रित तटस्थता आणि स्वनेतृत्वाखालील महासत्ता

पहलगामला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादाच्या मुद्द्यावर जग भारताच्या बाजूने आहे, असा आभास निर्माण झाला. परंतु, ‘ऑपरेशन सिंदूर’ला सुरुवात झाल्यावर जेव्हा युद्धाचा प्रसंग आला, तेव्हा भारत-पाकिस्तानला एकाच तराजूतून मोजणारी परिस्थिती फारशी बदललेली नाही, असे आपल्या लक्षात आले. भारताच्या दृष्टीने हा पहिलाच अनुभव नव्हता. परंतु, गेल्या काही वर्षांत भारताचा आंतरराष्ट्रीय प्रभाव वाढत आहे, असे आपण समजत होतो. तो आपला भ्रम होता व भारत आहे त्या स्थितीवरच पुन्हा परतला आहे, असे एखाद्याला वाटू शकते. परंतु ही वस्तुस्थ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121