माझ्या जीभेला थोडा त्रास आहे, ऑपरेशन झालंयं, म्हणून मी थुंकतो!
स्वतःच्या वक्तव्यावर संजय राऊतांचे घुमजाव!
03-Jun-2023
Total Views | 530
मुंबई : चिड आणि संताप कशाही प्रकारे व्यक्त होऊ शकते. मी कुठे थुंकलो मला दाखवा. माझ्या दाताचा त्रास होता म्हणून ती कृती झाली अशी सारवासारव संजय राऊतांनी केली आहे. संजय शिरसाट यांच्याबाबत प्रश्न विचारताच राऊत थुंकल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. गद्दारांवर थुंकणं हा हिंदु संस्कृतीचा भाग आहे अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे. इतकेच नाही तर यासाठी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा दाखला देखील दिला आहे.
संजय राऊत म्हणाले की, "हे वीर सावरकरांचे हे भक्त आहेत. एकदा वीर सावरकरांना न्यायालयात आणलं होतं. सावरकरांनी पाहिलं की, त्यांची माहिती देणारा बेईमान त्या न्यायालयाच्या कोपऱ्यात उभा असल्याचे त्यांनी पाहिलं. वीर सावरकर त्याच्याकडे बघून थुंकले. इतिहासात नोंद आहे. त्यामुळे बेईमानांवर थुंकणं ही हिंदू संस्कृती, हिंदूत्व याचा एक भाग आहे. पण मी कोणावरही थुंकलो नाही. पण वीर सावरकरांनी देखील आपला संताप हा बेईमानांवर, देशाच्या गद्दारांवर न्यायालयात थुंकून व्यक्त केला होता."
तुम्ही स्वतःची तुलना सावरकरांशी करत आहात का? असे विचरले असता संजय राऊत म्हणाले की, "मी सावरकरांचा भक्त आहे. सावरकर, लोकमान्य टिळक, बाळासाहेब ठाकरे या सगळ्यांच्या चांगल्या गोष्टी आम्ही घेत असतो. चिड आणि संताप कशाही प्रकारे व्यक्त होऊ शकते. मी कुठे थुंकलो मला दाखवा. माझ्या दाताचा त्रास होता म्हणून ती कृती झाली." असं राऊत म्हणाले.