मुंबई : भाजप नेत्या स्मृती ईराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केला असून अमेरिका दौऱ्यात घेतलेल्या भेटीचा त्यांनी यावेळी दाखला दिला आहे. अमेरिकन उद्योगपती सोरोस यांच्यांशी संबंध असणाऱ्या सुनीता विश्वनाथ यांच्यासोबतचा एक फोटो त्यांनी शेअर केला आहे. भाजप नेत्या स्मृती ईराणी यांनी पत्रकार परिषद घेत जॉर्ज सोरोस यांच्या सहकारी सुनीता विश्वनाथ यांचा सहभाग राहुल गांधी यांच्या बैठकीत होता, असा आरोप त्यांनी केला. स्मृती ईराणींनी राहुल गांधींना यावर प्रश्न विचारला असून, भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या व्यक्तींसोबत राहुल गांधी विदेशात बैठका का घेतात. तसेच, जॉर्ज सोरोस यांच्यांशी संबंध असणाऱ्या काँग्रेसच्या जुन्या सहकाऱ्यांचा उल्लेख करत राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या भारतविरोधी लोकांची नावेदेखील त्यांनी पत्रकार परिषदेत घेतली.
दरम्यान, भाजप नेत्या स्मृती ईराणी म्हणाल्या की, राहुल गांधी आणि जॉर्ज सोरोस यांचे संबंध जुने असून त्यांनी भारतविरोधी भूमिका घेण्यात सहभाग नोंदवला आहे. तसेच, त्या म्हणाल्या, जॉर्ज सोरोस यांचा भारताविषयी असलेला विचार हिंदुस्थानातील प्रत्येक भारतीयाला माहीत असूनही राहुल गांधी हे त्यांच्याशी जवळीक साधत आहेत, असा गंभीर आरोपदेखील त्यांनी यावेळी केला. तसेच, ते गांधी घराण्याशी असलेले त्यांचे नाते दृढ करत आहेत का, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. तसेच, आणीाबाणी संदर्भात ईराणी म्हणाल्या, बिगर भाजपशासित राज्यात काँग्रेस आणीबाणीचा काळा इतिहास दडपू शकते परंतु, आमच्या राज्यात याचे सत्य प्रत्येकांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे ते सत्यापासून दूर जाऊ शकत नाही असेही त्या म्हणाल्या.
कोण आहेत सुनीता विश्वनाथ?
सुनीता विश्वनाथ या अमेरिकास्थित सामाजिक कार्यकर्त्या असून हिंदू फॉर ह्युमन राइट्स नावाच्या एका संस्थेच्या सह-संस्थापक आहेत, ही संघटना वेळोवेळी हिंदूंच्या नावाने हिंदूंच्या विरोधात खोटे आणि अपप्रचार पसरवण्याचे काम करत असून या संघटनेच्यामार्फत ‘हिंदू विरुद्ध हिंदुत्व’ असे आख्यान चालवून लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत आहे. त्याचबरोबर स्वतः सुनीता विश्वनाथ देखील हिंदू देवतांची बदनामी करणारी वक्तव्ये त्यांनी केली आहेत.