... म्हणुन आंबेनळी घाटाचा प्रवास टाळा!

    28-Jun-2023
Total Views | 523

Ambenli Ghat 
 
 
मुंबई : आंबेनळी घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे पोलादपूरकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हा रस्ता बंद करण्यात आला आहे. जेसीबीच्या मदतीने रस्ता मार्ग मोकळा केला जात आहे. रस्त्याला भेगा पडल्या आहेत.
 
 
Ambenli Ghat
 
त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. २७ जून च्या रात्री ११ वा. आणि २८ जून सकाळी अशी दोन वेळा दरड कोसळली आहे.
 
 
Ambenli Ghat
 
याच मार्गाने महाबळेश्वरकडे जाता येते. मात्र, दरड कोसळल्यानंतर या मार्गाने वाहतुक थांबवण्यात आली आहे. ताम्हणी घाटातून पर्यायी वाहतूक वळवण्यात आली आहे. या पर्यायी मार्गाचा किंवा इतर मार्गाचा प्रवाशांनी वापर करावा, असं आवाहन करण्यात येत आहे.
 

Ambenli Ghat 
 
'जीव धोक्यात घालू नका. आम्ही वाहने अडवत आहोत. रस्ता बंद केला आहे. पर्यायी मार्ग अनेक आहेत. गरज नसेल, अत्यंत तातडीचे असेल तरच या. पण शक्यतो आंबेनळी घाटातून प्रवास टाळा.' असं आवाहन पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे यांनी केलं आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121