विपुल शाह चित्रपटातून मांडणार 'देशाला हादरवून सोडणारे सत्य' म्हणजेच 'बस्तर'

    27-Jun-2023
Total Views |
bastar-poster-released-from-the-kerala-story-makers

मुंबई : 'द केरला स्टोरी' च्या यशानंतर आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'बस्तर' नावाचा चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये लिहिले आहे - "देशाला हादरवून सोडणारे छुपे सत्य - बस्तर."
 



हा चित्रपट ५ एप्रिल २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.मात्र या चित्रपटात कोण स्टारकास्ट असेल याचा खुलासा अद्याप झालेला नाही. पण लास्ट मान्क मीडियाच्या सहकार्याने सनशाईन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये विखुरलेले जंगल आणि बंदुका दिसत आहेत.

हा चित्रपट जसा नक्षलवादाच्या मुद्द्यावर आधारित असेल. त्यामुळे काही डाव्या विचारसरणीचे लोक या चित्रपट निर्मात्यांना सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. तर काही जण म्हणत आहेत की, या चित्रपटाच्या निर्मितीला वेळ लागला तरी या चित्रपटाचा दर्जा उत्कृष्ट असावा.

हा चित्रपट विपुल अमृतलाल शाह निर्मित करत आहेत. याआधी विपुल शाह यांनी द केरला स्टोरी या चित्रपटाची निर्मिती करत प्रचंड यश मिळवलं होतं. सुदीप्तो सेन दिग्दर्शित या चित्रपटाने २५६ कोटींची कमाई केली.