व्यसन...सकारात्मकतेचे

    26-Jun-2023
Total Views | 110
Article On Positive Addiction In Life

दरवर्षीप्रमाणे दि. 26 जून रोजी ‘जागतिक व्यसनविरोधी दिन’ साजरा करण्यात आला. जगातील आरोग्याची ही समस्या आज ही तितकीच जटील आहे. व्यसन हा एक गुंतागुंतीचा आजार आहे. शेवटी, प्रभावी आधुनिक उपचारांबरोबरच त्यातून बाहेर पडणे आणि पुनर्वसनाच्या दिशेने पहिले पाऊल टाकणे हे आपल्यावर अवलंबून आहे. त्यानिमित्ताने थोडेसे सकारात्मक विवेचन.

सनमुक्त होण्याच्या प्रक्रियेत सकारात्मक आणि नकारात्मक दृष्टिकोनाचा प्रभाव व्यक्तीच्या पलीकडे पसरतो. त्यांच्या इतरांशी असलेल्या नातेसंबंधांवर परिणाम करतो. नकारात्मक विचारसरणी चांगल्या लोकांना त्यांच्यापासून दूर घेऊन जाते. ज्यामुळे व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तींना एक ठोस समर्थन देणारे आणि मानसिक आधार पुरविणारे नेटवर्क प्रस्थापित करणे कठीण होते. नकारात्मक विचार आणि दृष्टिकोन वैयक्तिक प्रगतीतदेखील आडकाठी आणू शकतात. ज्यामुळे तणाव वाढतो आणि ते पुन्हा व्यसनाधीनतेत पडण्याचा धोका वाढतो. जगात व्यसनाधीनता ही कुणाची निवड नसावी ते अनेकदा अनुवांशिक आहे. तसेच ते परिस्थितीजन्य आहे.

 अनेकांसाठी, त्यांच्या व्यसनाचा एक भावनिक पैलूदेखील महत्त्वाचा आहे. ड्रग्ज आणि अल्कोहोल वापरल्याने व्यसनाधीन व्यक्तीला वेदना जाणवण्यापासून तात्पुरते संरक्षण मिळते, ज्यामुळे त्यांना त्यांच्या भावनिक समस्या थोड्या काळासाठी काबूत ठेवता येतात. मद्यपान एक काल्पनिक सुखी जीवन जगण्याचे साधन बनू शकते: भावनिकदृष्ट्या, सुटकेचा एक तात्पुरता मार्ग स्वतःला प्रदान करून, अंतर्मनातील वेदना किंवा खोलवर स्थिरावलेल्या समस्या अशा व्यसनजन्य पदार्थांच्या वापराने कायमसाठी दूर होणार नाहीत. ते फक्त चक्रवाढ पद्धतीने वाढत जातील. नकारात्मक परिणाम अनुभवत असूनही, बरेच व्यसनी जगण्यासाठी आणि तात्पुरते सुसह्य वाटण्यासाठी ड्रग्ज आणि अल्कोहोलवर अवलंबून असतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या व्यसनाशी आपुलकीची भावना निर्माण होते. तथापि, व्यसनाला चिकटून राहिल्याने दीर्घकाळात तसा विधायक फायदा काहीच होत नाही. शेवटी ते व्यसन जीवंत ठेवण्यासाठी आर्थिक, शारीरिक आणि भावनिक खर्च करावेच लागतात.

तथापि, व्यसनमुक्तीचा मार्ग हा एक सुदृढ पर्याय आहे, ज्याची निवड प्रत्येकाला करता येईल. ‘मी माझे निकोप स्वातंत्र्य निवडतो’ हे सांगण्यासाठी धैर्य आणि समर्पण आवश्यक आहे. एकदा व्यक्तीने बदलण्याचा निर्णय घेतला की, आत्मविश्वासाने स्वतःला प्रेरित करून पोषक वातावरण निर्माण करणार्‍या तज्ज्ञांच्या मदतीने बदल अपरिहार्य आहे. तुम्ही ड्रग्ज घेणे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे आणि तुम्ही व्यसनमुक्त जीवनासाठी सज्ज झाला आहात. हा मोठा निर्णय तुमच्या आयुष्यातील प्रत्येक पैलू बदलेल. अर्थात, आपण आधीच निरोगी जीवनाच्या मार्गावर आहात हे जाणून घेणे रोमांचक आहे; तरीही मनात, संदिग्धता आणि भीती वाटणे सामान्य आहे. सकारात्मक मानसिकतेसह आपल्या नवजीवनाकडे जाण्याने जीवनातसंक्रमण होऊ शकते. सकारात्मक विचारसरणी एक आश्वासक वातावरण आपल्याभोवती निर्माण करू शकते. कारण, लोक नैसर्गिकरित्या सकारात्मक दृष्टिकोन असलेल्यांकडे आकर्षित होतात. त्यामुळे पुनर्वसन होणार्‍या व्यक्तींना त्यांच्या समवयस्क, थेरपिस्ट आणि समर्थन गटांशी मजबूत ‘कनेक्शन’ तयार करण्यात मदत होऊ शक्यतो. व्यसनमुक्तीच्या वाटेत अनेक आव्हाने असतील आणि जेव्हा तुम्ही त्यांना सकारात्मक मानसिकतेने पूर्ण तयारीनिशी भेटता, तेव्हा तुम्ही त्या आव्हानांना अधिक चांगल्या प्रकारे सामोरे जाण्यास सक्षम होता.

सकारात्मक वृत्ती व्यसनमुक्तीच्या उपचारांचा प्रभाव वाढवू शकते. यामुळे तुमची मानाने खंबीर शांत होण्याची आणि व्यसनजन्य पदार्थापासून दूर राहण्याची शक्यतादेखील वाढू शकते. शेवटी व्यसनमुक्ती ही आपले सक्षम विचार, संयम, सहनशीलता आणि चिकाटीची लढाई आहे. तुमची स्वतःची मानसिक चौकट आणि स्थिती तुमच्या सुधारणेवर खूप फरक करेल. मूड आणि मानसिकतेतील बदल तुमच्या वर्तनावर परिणाम करू शकतात. तुम्ही उपचारांना कसा प्रतिसाद द्याल, यावर हे अवलंबून राहील. उदाहरणार्थ, अधिक सकारात्मक विचारसरणी असलेले लोक उपचारांना अधिक ग्रहणक्षम असू शकतात. ते व्यसनापासून मुक्त होण्यास आणि स्वतःला पुनर्वसित करण्यास अधिक इच्छुक असू शकतात. जे लोक अधिक सकारात्मक आहेत, ते पुनर्वसन केंद्रात देऊ केलेल्या इतर अनेक संसाधनांचा लाभ घेऊ शकतात. सामाजिक प्रक्रियेद्वारे त्यांना मानसिक समर्थन देणारे मजबूत भावनिक नेटवर्क तयार करण्यासाठी ते अधिक मित्र परिवारदेखील बनवू शकतात. व्यसनमुक्तीच्या वाटेत कितीही अडथळे आले, तरीही मन सामर्थ्याच्या बळावर त्यांनी उपचार सोडून देण्याची शक्यता खूप कमी असते.

व्यसनातून मुक्ती मिळवणे आणि पुनर्वसन होणे ही आयुष्यातील दीर्घकालीन प्रक्रिया आहे हे जरी गुपित नसले तरी, या संपूर्ण प्रक्रियेत सकारात्मक विचार करायला शिकल्याने अनेक अमर्याद फायदे मिळतात.

स्वयं-कार्यक्षमता वाढते - पुनर्वसित झालेल्या लोकांना जेव्हा आपण करू शकतो, हा विश्वास जाणवतो. तेव्हा त्यांची संयमपूर्ण उद्दिष्टे साध्य करण्याची शक्यता अधिक वाढते.
कमी झालेला ताण - सकारात्मक विचार करण्याची निवड करणार्‍या व्यक्ती तणावपूर्ण आणि कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी अधिक सुसज्ज असतात आणि त्यांनी मादक पदार्थ आणि अल्कोहोलचा दुरुपयोग करण्याची शक्यता कमी असते.
कमी उदासीनता - व्यक्ती जेव्हा पुनर्वसनासाठी पोषक असे सकारात्मक विचार करतात, तेव्हा त्यांना नैराश्याच्या त्रास होण्याची शक्यता कमी असते.
आजाराशी लढण्याची क्षमता वाढते- सामान्यतः सकारात्मक लोक रोगप्रतिकारक शक्ती उत्तम कमावत असल्याने सामान्य सर्दी आणि जंतू संक्रमणासारख्या गोष्टींना कमी संवेदनाक्षम असतात. परिणामी, त्यांचे शारीरिक आरोग्य सुदृढ होते. इतरांना प्रेरित करण्याची शक्यता वाढते, जेव्हा या व्यक्ती सक्रियपणे सकारात्मकतेचा सराव करतात, तेव्हा ते इतरांवर सकारात्मक मार्गाने प्रभाव पाडण्याची आणि त्यांच्या समवयस्कांना त्यांची स्वतःची संयमी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रेरित करण्याची अधिक शक्यता असते.

ड्रग्ज किंवा अल्कोहोल कसे मिळवायचे, यापेक्षा इतर विधायक आणि उपयुक्त गोष्टींवर लक्ष केंद्रित करता येईल.एकेकाळी व्यसनजन्य पदार्थांमुळे निस्तेज झालेल्या विधायक संवेदना वाढवता येईल.

सकारात्मक वृत्तीने जगण्यासाठी व्यक्ती शरीर आणि मनाने खंबीर असणे आवश्यक आहे. व्यसन हे इतके आव्हानात्मक का आहे? कारण, हा रोग स्वतःशीच एक अंतर्गत लढाई निर्माण करतो, ज्यात व्यसन विकार असलेले लोक सतत संघर्ष करतात. जीवनाच्या या निर्णायक वेळी, आध्यात्मिक बाजू मजबूत करणेदेखील आवश्यक आहे. दररोज ध्यान केल्याने व्यक्तीला आपले लक्ष केंद्रित करण्यात आणि आत्मसन्मान वाढविण्यात मदत होते. बहुतेक लोक भौतिकवादी जगात राहतात व वाहत जातात. अध्यात्मिक बाजू तयार करण्यासाठी वेळ गुंतवल्यामुळे सर्वांत महत्त्वाच्या गोष्टींचे प्रबोधन होईल, व्यसनमुक्ती जलद आणि दीर्घकालीन होईल. जे तुम्ही अवतीभवती पसरवित असता, तेच तुमच्याकडे परत येते, या म्हणीप्रमाणे जेव्हा तुम्ही आजूबाजूच्या लोकांमध्ये सकारात्मक ऊर्जा पसरवता, तेव्हा तुम्हाला तीच शक्ती परत मिळेल. यात जीवनाबद्दल सकारात्मक बोलणे आणि आपण व्यसनातून बाहेर येत असलेल्या अनुभवाबद्दल बोलणे समाविष्ट आहे.

 जीवनाबद्दल आशावादी राहिल्याने तुम्हाला उत्साही करणारी वृत्ती परत मिळते. जर एखादी व्यक्ती दीर्घकालीन व्यसनमुक्ती शोधत असेल, तर त्यांनी सकारात्मक विचार करायला हवा. आयुष्यातील या आव्हानात्मक टप्प्यावर आपली काळजी घेणार्‍या लोकांशी सकारात्मक संबंध निर्माण करायला हवेत. सकारात्मक लोकांमध्ये स्वत:ला वेढल्याने व्यक्तीची आत्मकार्यक्षमता सुधारण्यास मदत होईल. स्व-कार्यक्षमतेचा सराव करणे म्हणजे आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवणे, हे जीवनालानवीन वळणावर केव्हाही महत्त्वाचे आहे. तुमचा आत्मविश्वास जर तुम्ही कितीही अवघड कृती करू शकता आणि इच्छित परिणाम प्राप्त करू शकता असा आहे, तर ते प्रेरणा आणि वर्तन प्रभावित करेल. स्वतःची काळजी घेणे, हे लक्षात ठेवणे कोणासाठीही महत्त्वाचे आहे. परंतु, व्यसनाधीन लोकांसाठी ते अधिक महत्त्वाचे आहे.
 
डॉ. शुभांगी पारकर  
अग्रलेख
जरुर वाचा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121