मुंबई : कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर इतका सर्रास होताना दिसत असताना त्याबाबत आता सुरक्षेविषयीचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. जगातील बव्हंशी राजकीय नेत्यांकडून याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत असून एआय या चॅट जीपीटी कंपनीचे सीईओ सॅम अल्टमन यांनी याविषयी तसे सुतोवाच करून सबंध जगाला धोरण बनविण्याचे सुचवले आहे. अशातच आता 'ग्रुप आयबी' कडून एक अहवाल प्रसिध्द करण्यात आला असून यात धक्कादायक माहिती उघड करण्यात आली आहे. चॅट जीपीटी वापरणाऱ्या एक लाख युझर्सचा डेटा हॅक झाला असल्याची माहिती या अहवालातून समोर आली आहे.
दरम्यान, ग्रुप आयबी नावाच्या सायबर टेक्नॉलॉजी कंपनीने हा अहवाल प्रसिध्द केले आहे. तसेच, डेटा हॅक झालेल्या युझर्सपैकी सर्वाधिक लोक हे भारतातील (१२,६३२) असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच, हॅक केलेला डेटा हा डार्क वेबवर विकल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ChatGPT एक क्रांतिकारी कृत्रिम बुद्धिमत्ता साधन बनत आहे. परंतु, एआयबाबत वेळोवेळी जगातील राजकीय आणि तंत्रज्ञान नेत्यांनी जनरेटिव्ह तंत्रज्ञानाच्या संभाव्य गैरवापरापासून सावधगिरी बाळगली आहे. तसेच आता ही भीती खरी ठरत आहे याचे कारण ग्रुप-आयबीच्या अहवालात असे समोर आले आहे की सुमारे १ लाख लोकांची चॅटजीपीटी खाती हॅक झाल्यानंतर त्यांच्या डेटाशी तडजोड करण्यात आली आहे. उल्लेखनीय म्हणजे, भारताने सर्वाधिक तडजोडी केल्या आहेत, असे अहवालात म्हटले आहे.
दरम्यान, ग्रुप-आयबीच्या थ्रेट इंटेलिजेंस युनिटने उघड केले आहे की, भारत (१२,६३२), पाकिस्तान (९,२१७) आणि ब्राझील (६,५३१) हे सर्वात मोठे देश आहेत जिथे चॅट जीपीटी वापरकर्ते सायबर हल्ल्यामुळे प्रभावित झाले आहेत.