भारतीयांना आता लवकरच मिळणार ई-पासपोर्ट!

    24-Jun-2023
Total Views | 157
passport
 
नवी दिल्ली : भारतीयांना आता लवकरच ई-पासपोर्ट मिळणार आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पासपोर्ट सेवा दिवसानिमित्त लवकरच पासपोर्ट सेवा कार्यक्रम २.० सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर लोकांना एक चिप असलेला ई-पासपोर्ट मिळेल.
 
परराष्ट्र मंत्री म्हणाले की, "पासपोर्ट सेवा लवकरच लोकांना विश्वासार्ह, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने पासपोर्ट सुविधा प्रदान करेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय तंत्राचा वापर नवीन चिप्ससह प्रगत आणि अपग्रेडेड पासपोर्ट तयार करण्यासाठी देखील केला जाईल."
 
ई-पासपोर्ट कार्यक्रम २.० अंतर्गत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पासपोर्ट बनवले जातील. यामध्ये अद्ययावत बायोमेट्रिक्स तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे पासपोर्ट मिळवणे सोपे होणार असून युजरचा डेटाही सुरक्षित राहणार आहे. ई-पासपोर्टसाठी लागणारे सॉफ्टवेअर आयआयटी कानपूर आणि एनआयसीने विकसित केले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

Waqf Act संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारित कायदा पारित झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सही करत कायद्याला मंजूरी देत वाट मोकळी केली आहे. याचा देशभरात चांगला प्रतिसाद दिसत आहे. तर काही धर्मांध यांचा गैर अपप्रचार करत आहेत. वक्फ कायदा लागू झाल्यानंतर इतरांच्या मालकी हक्कांवर वक्फ दावा करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. अशातच आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. ज्यात अवैधपणे जमिनींवर वक्फने दावा केला आणि आता त्याविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेलीतील असल्याचे सांगण्यात ..

पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची

पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची 'ममता', मिथून चक्रवर्तींचा हल्लाबोल

Mamata Banerjee पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारित कायद्यावरून रान पेटलं आहे. वक्फ सुधारित कायदा मंजूर झाल्यानंचर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हिंदूंसाठी धोक्याची घंटा ठरत असल्याचे प्रतिपादन भाजप नेते आणि अभिनेते मिथून चक्रवर्तींनी केले आहे. बंगालमध्ये वक्फ कायदा लागू होऊ देणार नसल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. यामुळे आपली व्होट बँक दुरावली जाऊ नये, हे लक्षात घेत कायद्या सुव्यवस्था न ठेवता बांग्लादेशप्रमाणे पश्चिम बांगलादेशची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच मिथून चक्रवर्तींनी बारताच्या संविधानाचा..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121