न्यूयॉर्क : टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) एलॉन मस्क यांनी दि. २० जून रोजी सांगितले की, इलेक्ट्रिक कार निर्मात्यांना भारतात लवकरात लवकर गुंतवणूक करू इच्छिते. तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर मस्क यांनी ही माहिती दिली.टेस्लाच्या भारतात गुंतवणूक करण्याच्या योजनांबद्दल विचारले असता मस्क म्हणाले की, "मला खात्री आहे की टेस्ला भारतात असेल आणि ते शक्य तितक्या लवकर गुंतवणुक करेल" तसेच पंतप्रधान मोदींनी दिलेल्या समर्थनाबद्दल मस्क यांनी आभार मानले.
तसेच मस्क यांनी सांगितले की, "मी पंतप्रधान मोदींचा 'फॅन' आहे आणि पंतप्रधानांनी अनेक वर्षांपूर्वी कॅलिफोर्नियातील टेस्ला कारखान्याला भेट दिली होती.त्यामुळे मी भारताच्या भविष्याबद्दल कमालीचा उत्साही आहे. जगातील इतर कोणत्याही मोठ्या देशापेक्षा भारताकडे अधिक शक्यता आहेत. पीएम मोदींना खरोखरच भारताची काळजी आहे कारण ते आम्हाला भारतात आवश्यक गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करत आहेत, जे आम्हाला करायचे आहे. आम्ही फक्त योग्य वेळ शोधत आहोत.
एलॉन मस्क पुढे म्हणाले की, भारतामध्ये सौर ऊर्जा, स्थिर बॅटरी पॅक आणि इलेक्ट्रिक वाहनांसह शाश्वत ऊर्जा भविष्यासाठी मजबूत क्षमता आहे. त्यामुळे स्टारलिंक उपग्रह इंटरनेट सेवा भारतातही आणण्याची आमची आशा आहे. त्यासाठीच टेस्लाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात भारताला भेट देऊन तेथील मंत्र्याशी कार आणि बॅटरीसाठी उत्पादन केंद्र उभारण्याबाबत चर्चा केली.